शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटीच्या दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 15:22 IST

जीएसटीच्या आकारणीवेळी त्रुटी न काढण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना राज्य जीएसटीच्या दोघा अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले.

ठळक मुद्देजीएसटीच्या दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना अटकलाचलुचपत प्रतिबंधकच्या पथकाची कारवाई

सांगली : जीएसटीच्या आकारणीवेळी त्रुटी न काढण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच स्वीकारताना राज्य जीएसटीच्या दोघा अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहात पकडले.राज्य कर अधिकारी राजेंद्र महालिंग खोत (वय ५७) व कर सहायक शिवाजी महादेव कांबळे (३२) अशी दोघांची नावे आहेत. या दोघांविरुद्ध संजयनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेली माहिती अशी की, तक्रारदार कवठेमहांकाळ येथील असून त्यांच्या पत्नीच्या नावावर फर्निचरचा कारखाना आहे. त्यांनी तीन वर्षाचा मूल्यवर्धित कर मार्च २०१९ मध्ये आॅनलाईन पध्दतीने भरला होता.

त्यानंतर जीएसटी अधिकारी राजेंद्र खोत व शिवाजी कांबळे यांनी तक्रारदाराशी दूरध्वनीवरून संपर्क साधून, तुम्ही भरलेल्या मूल्यवर्धित करामध्ये त्रुटी निघण्याची शक्यता आहे. तुमच्यावर कारवाई होऊ शकते. आम्हाला एक लाख रुपये द्या, आम्ही यामध्ये त्रुटी काढणार नाही, असे सांगितले.तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे या दोघांविरोधात तक्रार अर्ज दाखल केला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांच्या तक्रारीची पडताळणी केली असता, यात राजेंद्र खोत याच्या सांगण्यावरून शिवाजी कांबळे याने प्रथम ७० हजार व चर्चेअंती ६० हजार रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.त्यानंतर लाचलुचपत विभागाच्या पथकाने राजनगर येथील जीएसटी कार्यालयात सापळा लावला. यावेळी खोत याने लाचेची रक्कम शिवाजी कांबळे याच्याकडे देण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदारांनी ४० हजाराची रक्कम कांबळे याच्याकडे दिली. त्यावेळी छापा टाकून लाचलुचपत प्रतिबंधकच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले.ही कारवाई अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर अधीक्षक सुषमा चव्हाण, उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुरूदत्त मोरे, प्रशांत चौगुले, संजय कलकुटगी, अविनाश सागर, जितेंद्र काळे, भास्कर भोरे, संजय संकपाळ, रवींद्र धुमाळ, राधिका माने, सारिका साळुंखे-पाटील, अश्विनी कुकडे, बाळासाहेब पवार यांच्या पथकाने केली.याप्रकरणी राजेंद्र खोत व शिवाजी कांबळे या दोघांविरोधात संजयनगर पोलीस ठाण्यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागSangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीBribe Caseलाच प्रकरण