येळवीत दोन गटांत मारामारी
By Admin | Updated: February 19, 2015 23:41 IST2015-02-19T23:23:57+5:302015-02-19T23:41:52+5:30
चौघे जखमी : संशयित ताब्यात, विहिरीच्या पाण्यावरून वाद

येळवीत दोन गटांत मारामारी
जत : समाईक विहिरीतील पाण्याच्या पाळीच्या वादातून व न्यायालयात प्रलंबित असलेला खटला मागे घ्यावा, या कारणावरुन येळवी (ता. जत) येथे दोन गटात मारामारी झाली. यात पांडुरंग रामदास खरात, राजाराम रामदास खरात, रामदास पांडुरंग खरात, कमळाबाई रामदास खरात, मनीषा पांडुरंग खरात (सर्व रा. येळवी, ता. जत) यांनी चंद्राबाई बाळासाहेब खरात (वय ५०), बाबासाहेब रामदास खरात (६०), भाऊसाहेब बाबासाहेब खरात (३०, रा. येळवी) यांना कुऱ्हाड, कोयता, लोखंडी गज व काठीने मारहाण करून जखमी केले. आज, गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता खरात वस्तीजवळ ही घटना घडली. याप्रकरणी चंद्राबाई बाबासाहेब खरात यांनी वरील पाचजणांच्या विरोधात फिर्याद दाखल केली आहे. जखमींवर सांगलीत उपचार सुरु आहेत. याप्रकरणी दोन संशयितांना जत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.पांडुरंग खरात व बाबासाहेब खरात यांच्यात समाईक विहिरीतील पाण्याच्या पाळीवरून व शेतजमिनीचा वाद आहे. यासंदर्भात न्यायालयात खटला प्रलंबित आहे. आज सकाळी चंद्राबाई खरात व त्यांच्या घरातील इतर नागरिक शेतात गेले होते. त्यांनी विद्युत मोटार सुरू करून लसूण पिकाला पाणी सोडले होते. त्यावेळी पाठीमागील जलवाहिनीचा चेंबरमधून पांडुरंग व राजाराम यांनी पाणी घेतले. यातून त्यांच्यात प्रथम बाचाबाची होऊन त्याचे पर्यवसान मारामारीत झाले. पोलीस उपनिरीक्षक आप्पासाहेब कत्ते तपास करीत आहेत. (वार्ताहर)
किरकोळ वाद विकोपाला
सकाळी चंद्राबाई खरात व त्यांच्या घरातील इतर नागरिक शेतात गेले होते. त्यांनी विद्युत मोटार सुरू करून लसूण पिकाला पाणी सोडले होते. त्यावेळी पाठीमागील जलवाहिनीचा चेंबरमधून पांडुरंग व राजाराम यांनी पाणी घेतले. यातून त्यांच्यात प्रथम बाचाबाची होऊन त्याचे पर्यवसान मारामारीत झाले. यात चौघेजण जखमी झाले.