शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत बाळूमामा मंदिरातील हिशोब मागितला म्हणून दोन गटांत मारामारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 17:46 IST

सांगली : शहरातील शिवोदयनगर येथे असलेल्या बाळूमामा मंदिर देवस्थानमधील पैशाचा हिशेब मागितल्यावरून अकरा जणांनी तरुणांसह अन्य दोघांना बेदम मारहाण ...

सांगली : शहरातील शिवोदयनगर येथे असलेल्या बाळूमामा मंदिर देवस्थानमधील पैशाचा हिशेब मागितल्यावरून अकरा जणांनी तरुणांसह अन्य दोघांना बेदम मारहाण केली. रविवार, दि. १३ रोजी मंदिराजवळ हा प्रकार घडला. याप्रकरणी दोन्ही गटांनी परस्परविरोधी फिर्याद संजयनगर पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.विशाल पोपट यमगर (रा. लक्ष्मीनगर, जुना बुधगाव रोड, सांगली) याने दिलेल्या फिर्यादीनुसार आर्यन जाधव, अजय गोसावी, प्रशांत गोसावी, अभिषेक गोसावी, पार्थ जाधव, विक्रांत गोसावी, दीपक पाटील, सौरभ गोसावी, महेश्वर भोपी, दिनकर गोसावी, भगवान गोसावी (सर्व रा. लक्ष्मीनगर, जुना बुधगाव रोड, सांगली) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी यमगर हा जुन्या बुधगाव रोडवरील शिवोदयनगर येथील बाळुमामा मंदिरात गेला होता. त्यावेळी संशयित तेथे होते. यावेळी विशालने देवस्थानमधील पैशाचा हिशेब संशयितांकडे मागितला. याचा राग आल्याने अकरा जणांनी विशालसह परमेश्वर दगडू थोरात आणि अक्षय अशोक यमगर यांना बेदम मारहाण केली.तर अश्विनी अनंत जाधव यांनी दिलेल्या फियादीनुसार संशयित विशाल यमगर आणि अन्य दोन सहकाऱ्यांनी फिर्यादीसह त्यांच्या आई आणि मुलास लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे नमूद केले आहे. यामध्ये अश्विनी जाधव, द्रौपदी भगवान गोसावी, पार्थ अनंत जाधव हे जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात वैद्यकीय उपचार करण्यात आले आहेत. दोन्ही गटांच्या फिर्यादीनुसार संशयितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

टॅग्स :SangliसांगलीBalumamachya Navane Changbhaleबाळूमामाच्या नावानं चांगभलं