दरीबडची-लमाणतांड्यावर दोन गटात तुंबळ हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:29 IST2021-04-23T04:29:48+5:302021-04-23T04:29:48+5:30

संख : जत तालुक्यातील लमाणतांडा (दरीबडची) येथे शेतातून ट्रॅक्टर नेल्याच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यात चारजण जखमी ...

Two groups clashed over Daribadchi-Lamantanda | दरीबडची-लमाणतांड्यावर दोन गटात तुंबळ हाणामारी

दरीबडची-लमाणतांड्यावर दोन गटात तुंबळ हाणामारी

संख : जत तालुक्यातील लमाणतांडा (दरीबडची) येथे शेतातून ट्रॅक्टर नेल्याच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. यात चारजण जखमी झाले असून, ही घटना बुधवारी रात्री साडेआठला घडली.

यामध्ये शीतल बाळू ठोंबरे, भारत कोंडिबा ठोंबरे, बाळू कोंडिबा ठोंबरे, तानाजी भारत ठोंबरे (सर्व ठोंबरे वस्ती, संख) हे जखमी झाले. त्यांना चाकू, काठीने गंभीर मारहाण करण्यात आली आहे. यामधील भारत ठोंबरे हे गंभीर जखमी आहेत. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

लमाणतांडा (दरीबडची) येथे ठोंबरे व संशयितांची शेती आहे. बुधवारी शेतात ट्रॅक्टरने काम सुरू होते. यावेळी संशयितांच्या शेतातून ट्रॅक्टर जात होता. त्यावेळी ट्रॅक्टर घेऊन का चाललास, असे म्हणून त्यांच्यात बाचाबाची झाली. गुलाब चव्हाण, गोरख मोहन राठोड, नवनाथ लालासिंग राठोड व अनोळखी (सर्व रा. लमाणतांडा, दरीबडची) यांनी ट्रॅक्टरची हेडलाईट फोडली. टायरमधील हवा घालवून टायर फोडले.

सागर गुलाब चव्हाण यांनी चाकूने बाळू ठोंबरे, शीतल ठोंबरे, चुलत भाऊ तानाजी ठोंबरे, चुलते भारत ठोंबरे यांच्यावर गंभीर वार केले. याप्रकरणी सागर गुलाब चव्हाण, गोरख मोहन राठोड, नवनाथ लालासिंग राठोड व अनोळखी यांच्यावर जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. गोरख मोहन राठोड याला अटक करण्यात आली आहे.

‘चोरावर मोर’ची चर्चा

लमाणतांडा (दरीबडची) येथील ओढापात्रातून ट्रॅक्टरने वाळू तस्करी सुरू होती. हा ट्रॅक्टर संशयितांच्या शेताजवळून जात होता. यावेळी ट्रॅक्टर अडविल्यावरून बाचाबाची झाली व त्यातून ही घटना घडली. दिवसभर या ‘चोरावर मोर’ची चर्चा सुरू होती.

Web Title: Two groups clashed over Daribadchi-Lamantanda