वांगी येथे तरसाच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:26 IST2021-08-29T04:26:59+5:302021-08-29T04:26:59+5:30
वांगी : वांगी (ता. कडेगाव) येथील पवार मळा परिसरात तरसाने केलेल्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार, तर दोन शेळ्या गंभीर ...

वांगी येथे तरसाच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार
वांगी : वांगी (ता. कडेगाव) येथील पवार मळा परिसरात तरसाने केलेल्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार, तर दोन शेळ्या गंभीर जखमी झाल्या. यामध्ये दीपक बाबूराव दोरगे या शेतकऱ्याचे अंदाजे ५० हजारांचे नुकसान झाले आहे.
वांगीपासून ३ किलोमीटरवर पवार वस्ती आहे. येथे दीपक दोरगे यांचे घर आहे. ते शेतीबरोबर शेळीपालन करतात. शनिवार, दि. २८ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्यादरम्यान घरातील लोक जनावरांना वैरण आणण्यासाठी गेले असता, परिसरातील उसाच्या फडातून आलेल्या तरसाने अंगणात बांधलेल्या शेळ्यांवर हल्ला केला. यामध्ये दोन शेळ्या ठार झाल्या, तर दोन शेळ्या गंभीर जखमी झाल्या. यामध्ये दाेरगे यांचे सुमारे ५० हजारांचे नुकसान झाले आहे. या परिसरात गेल्या दोन वर्षांत अनेकदा तरसाच्या हल्ल्याचे प्रकार घडले आहेत. वनविभागाने या तरसाचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.