दोघा सांगलीकरांचा झेंडा
By Admin | Updated: June 13, 2014 02:00 IST2014-06-13T01:32:18+5:302014-06-13T02:00:00+5:30
केंद्रीय लोकसेवा आयोग

दोघा सांगलीकरांचा झेंडा
इस्लामपूर/तासगाव : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) नागरी सेवा परीक्षेत दोघा सांगलीकरांनी झेंडा रोवला आहे. तासगाव तालुक्यातील विसापूरचे अमित राजेंद्र खटावकर संपूर्ण देशभरातून ७६५ व्या क्रमांकाने, तर इस्लामपूरचे मोतीलाल सहदेव शेटे ९१५ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले.
अमित खटावकर सध्या शहादा (जि. नंदुरबार) येथे स्टेट बॅँक आॅफ इंडियामध्ये प्रशिक्षणार्थी सहाय्यक व्यवस्थापक पदावर कार्यरत आहे. विसापूरच्या जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने सांगलीच्या वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातून यांत्रिकी (मेकॅनिकल) विभागाची पदवी मिळवली. खासगी कंपनीत तीन वर्षे नोकरी केल्यानंतर तो केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेकडे वळला. डिसेंबर २०१० पासून अभ्यासास सुरुवात केली. पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनीचे मार्गदर्शन घेतले.