मिरजेत दोन कुटुंबांत हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:29 IST2021-02-24T04:29:25+5:302021-02-24T04:29:25+5:30

नाझिया परवेझ खान यांची मुलगी झोया घरात असताना यातील श्रीकांत सातपुते (रा. गुरुवार पेठ) यांनी खान यांच्या घरात ...

Two families fight in Miraj | मिरजेत दोन कुटुंबांत हाणामारी

मिरजेत दोन कुटुंबांत हाणामारी

नाझिया परवेझ खान यांची मुलगी झोया घरात असताना यातील श्रीकांत सातपुते (रा. गुरुवार पेठ) यांनी खान यांच्या घरात जाऊन नाझियाचा मुलगा बादशाह ऊर्फ लाल्या याला शिवीगाळ केली. मुलगा बादशाह घरी आल्यानंतर श्रीकांत सातपुते यांनी त्याच्या हातातील वीट स्वतःच्या डोक्यात मारून घेऊन नाझिया व त्यांचा मुलगा बादशाहास मारहाण केली. त्यानंतर बादशाह याच्या दिशेने फरशी फेकली. फेकलेली फरशी बादशाह याने चुकविल्याने मुलगी झोया हिचे डोक्यात लागून ती गंभीर जखमी झाल्याची तक्रार आहे. श्रीकांत सातपुते यांनी खान कुटुंबातील पाचजणांविरुद्ध स्टील पाईपने मारहाणीची फिर्याद दिली आहे. सातपुते त्यांच्या घराबाहेर चप्पल दुरुस्ती व विक्री करतात. शेजारी राहणाऱ्या नाझिया यांचा मुलगा लाल्या याने घराच्या पत्र्यावर दगड मारल्याने आमच्या घरावर दगड का मारलास, असे त्यांनी विचारले. यावेळी वादावादी होऊन लाल्या याने श्रीकांत सातपुते यांना स्टीलच्या पाईपने डोक्यात व उजव्या हातावर मारून जखमी केले. लाल्यासोबत त्याची आई, मेहबूब, लाल्याची आजी नजीरा व लाल्याची बहीण यांनी शिवीगाळ व दमदाटी करून हाताने मारहाण केल्याची तक्रार आहे.

Web Title: Two families fight in Miraj