शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

तलावात कृषीपंप सोडताना विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू, सांगलीतील आटपाडीत घडली दुर्घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 14:17 IST

जेवणानंतर अनिकेतसोबत फिरायला म्हणून शेताकडे गेले आणि दुर्घटनेत त्यांना जीव गमवावा लागला

आटपाडी : येथील तलावातून पाणी उपशासाठी कृषीपंप सोडण्यासाठी गेलेल्या दोघा शेतकऱ्यांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. गुरुवारी (दि. २०) दुपारी तीन वाजता ही घटना घडली. अनिकेत अमृत विभूते (वय २७, रा. माडगुळे, ता. आटपाडी) आणि त्याच्या मावशीचे पती विलास मारुती गुळदगड (४७, रा. शेवते, ता. पंढरपूर) अशी मृतांची नावे आहेत.आटपाडी शहराच्या पश्चिमेकडील तलावामध्ये हा प्रकार घडला. विभूतेची माडगुळे येथे शेती आहे. त्यासाठी आटपाडी तलावातून १२ किलोमीटरची पाइपलाइन करून पाणी नेले आहे. तराफ्याद्वारे विद्युतपंप पाण्यात सोडला आहे. गुरुवारी दुपारी अनिकेत व त्याच्या मावशीचे पती विलास दोघेही तलावाकडे गेले होते. तलावातील पाणीपातळी खालावल्याने पंप बाहेर आल्याचे दिसले. तो आणखी खाली सोडण्यासाठी दोघेही पाण्यात उतरले. यावेळी वायर शॉर्ट होऊन वीजप्रवाह पाण्यात उतरला होता. त्यामुळे दोघांनाही विजेचा जोरदार धक्का बसला. त्यांचा जागीच मृत्यू झाला. तलावाजवळच्या काही लोकांनी ही घटना पाहिली.काही अंतरावर असलेल्या तडवळेचे सरपंच जितेंद्र गिड्डे, दादासाहेब मरगळे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. वीजप्रवाह बंद करून दोघांनाही तलावातून बाहेर काढले. आटपाडी ग्रामीण रुग्णालयात नेले, पण उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच माडगुळे येथील नागरिकांनी रुग्णालयात गर्दी केली होती.

सकाळीच माडगुळेला आले अन्...अनिकेत विभूते अविवाहित होता. विलास गुळदगड गुरुवारीच शेवते येथून माडगुळेला आले होते. दुपारी जेवणानंतर अनिकेतसोबत फिरायला म्हणून शेताकडे गेले आणि दुर्घटनेत त्यांना जीव गमवावा लागला. दोघांच्या मृत्यूने कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

टॅग्स :SangliसांगलीelectricityवीजDeathमृत्यू