दोन दिवसांत तापमान होणार चाळिशीपार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:25 IST2021-04-06T04:25:01+5:302021-04-06T04:25:01+5:30
सांगली : दोन दिवसांमध्ये जिल्ह्याचे कमाल तापमान ४१ अंशावर जाण्याची शक्यता आहे. जिल्ह्याचा पारा आता वाढत असून, सोमवारी कमाल ...

दोन दिवसांत तापमान होणार चाळिशीपार
सांगली : दोन दिवसांमध्ये जिल्ह्याचे कमाल तापमान ४१ अंशावर जाण्याची शक्यता आहे. जिल्ह्याचा पारा आता वाढत असून, सोमवारी कमाल तापमान ३९ अंश सेल्सिअस नोंदले गेले.
जिल्ह्यातील कमाल व किमान तापमान सध्या सरासरीपेक्षा एका अंशाने जास्त आहे. भारतीय हवामान खात्याच्या निरीक्षणानुसार दोन दिवसांत पारा चाळिशीपार जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे किमान तापमानही विक्रमाच्या दिशेने जात आहे. मंगळवारी पारा ४० वर तर त्यानंतर ७ एप्रिलपासून ११ एप्रिलपर्यंत कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअसवर राहणार आहे. सोमवारी जिल्ह्याचे किमान तापमान २२ अंश सेल्सिअस नोंदले गेले. यात आणखी दोन अंशाची भर पडून तापमान २४ अंशावर जाण्याचा अंदाज आहे. त्यामुळे चोवीस तास तीव्र उकाड्याचा सामना नागरिकांना करावा लागणार आहे.
उन्हाच्या तीव्र झळांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने नागरिकांना अधिक सतर्क राहावे लागणार आहे. उष्म लाटांपासून बचावाची तयारी नागरिकांना करावी लागणार आहे. सापेक्ष आर्द्रताही सोमवारी ८२ टक्के नोंदली गेली.