भाटशिरगाव येथील चढ कमी करण्यासाठी दोन कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:31 IST2021-09-15T04:31:23+5:302021-09-15T04:31:23+5:30

शिराळा : भाटशिरगाव (ता. शिराळा) येथील सूतगिरणीसमोरील चढ कमी करण्यासाठी एक कोटी ९६ लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. येथील ...

Two crore to reduce fluctuations at Bhatshirgaon | भाटशिरगाव येथील चढ कमी करण्यासाठी दोन कोटी

भाटशिरगाव येथील चढ कमी करण्यासाठी दोन कोटी

शिराळा : भाटशिरगाव (ता. शिराळा) येथील सूतगिरणीसमोरील चढ कमी करण्यासाठी एक कोटी ९६ लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. येथील चढ कमी झाल्यानंतर प्रवाशांना प्रवास व शेतकऱ्यांना वाहतूक सुसह्य होईल, असे प्रतिपादन युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक यांनी केले.

भाटशिरगाव (ता. शिराळा) येथे नारायणदादा चव्हाण शेतकरी सूतगिरणी समोरील चढ काढण्यासाठी एक कोटी ९६ लाख रुपये खर्चाच्या कामाचा शुभारंभ मंगळवारी जिल्हाध्यक्ष नाईक त्यांच्या हस्ते झाला. या वेळी विराज नाईक बोलत होते. सरपंच वैशाली आलुगडे व उपसरपंच शिवाजी पाटील प्रमुख उपस्थित होते.

नाईक म्हणाले की, मानसिंगभाऊ मतदार संघाच्या चौफेर विकासासाठी प्रयत्नशील आहेत. नागरिकांची, शेतकऱ्यांची सोय याला प्राधान्यक्रम दिला जात आहे. बिऊर ते सागाव रस्त्यावरील भाटशिरगाव येथील चढ कमी करण्यासाठी आमदार नाईक यांनी १ कोटी ९६ लाख रुपये मंजूर करून दिले आहेत. त्यातून हे काम पूर्ण होईल.

माजी सरपंच समाधान देसाई यांनी स्वागत केले. यावेळी सोसायटी अध्यक्ष संपतराव देशमुख, गणपती मोरे, प्रकाश कुरणे, अक्षय सटाले, अनिल आलूगडे, शंकर देसाई, शुभम पाटील उपस्थित होते. गणेश आलुगडे यांनी आभार मानले.

140921\1724-img-20210914-wa0049.jpg

फोटो ओळी : भाटशिरगाव (ता. शिराळा) येथे रस्ते कामाचा शुभारंभ करताना युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक. शेजारी इतर मान्यवर.

Web Title: Two crore to reduce fluctuations at Bhatshirgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.