आष्टा पालिकेला दोन कोटींचा निधी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:18 IST2021-06-10T04:18:37+5:302021-06-10T04:18:37+5:30
आष्टा : जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या प्रयत्नातून आष्टा पालिकेला दोन कोटींचा निधी मंजूर झाला. या विकासकामांना पालिकेच्या ऑनलाइन सभेत ...

आष्टा पालिकेला दोन कोटींचा निधी मंजूर
आष्टा : जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या प्रयत्नातून आष्टा पालिकेला दोन कोटींचा निधी मंजूर झाला. या विकासकामांना पालिकेच्या ऑनलाइन सभेत मंजुरी देण्यात आली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा स्नेहा माळी होत्या. यावेळी मुख्याधिकारी डॉ. कैलास चव्हाण व उपनगराध्यक्षा प्रतिभा पेटारे उपस्थित होत्या.
वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजनेअंतर्गत शहरासाठी १ कोटी ५५ लाख मंजूर झाले आहेत, तर व्यायामशाळा बांधकाम व व्यायाम साहित्यासाठी २५ लाख आणि ट्रॅक्टरसह औषध फवारणी यंत्रासाठी १० लाख रुपये आहेत.
शहरातील सुमारे २०० पेक्षा जास्त दिव्यांगांना सुमारे ७ लाख ३० हजार रुपये समान वाटप करण्यात येणार आहे. विलासराव शिंदे कोविड सेंटरमधील रुग्णांना पालिकेच्या माध्यमातून सोयी-सुविधा देण्यास मान्यता देण्यात आली.
यावेळी झुंजारराव पाटील, धैर्यशील शिंदे, विमल थोटे, विजय मोरे, विशाल शिंदे, पी. एल. घस्ते, मनीषा जाधव, अर्जुन माने, शैलेश सावंत, तेजश्री बोंडे, वीर कुदळे उपस्थित होते.