शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

दोन कारची समोरासमोर धडक, डोंगरसोनी येथील पती-पत्नीसह तिघेजण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2021 12:23 IST

हा अपघात पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास झाला. या अपघातात दोन्ही कारचा चक्काचुर झाला. 

विटा : विट्याहुन पुसेसावळीकडे जाणाऱ्या व तिकडून विट्याकडे येणाऱ्या दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात पती-पत्नीसह तिघेजण ठार झाले. कपिल माणिक झांबरे व त्यांची पत्नी धनश्री कपिल झांबरे (रा. डोंगरसोनी, ता. तासगाव) व सुदर्शन गजानन निकम (रा. विटा) अशी अपघातात ठार झालेल्या तिघांची नावे आहेत. हा अपघात नेवरी (ता. कडेगाव) येथे आज, शुक्रवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास झाला. या अपघातात दोन्ही कारचा चक्काचुर झाला. डोंगरसोनी येथील कपिल झांबरे व त्यांची पत्नी धनश्री आणि प्रज्वल कुंडलिक झांबरे असे तिघेजण त्यांच्या कारने पुण्याहुन तासगावकडे निघाले होते. तर विटा येथील सुदर्शन गजानन निकम व संग्राम संजय गायकवाड हे दोघेजण खेराडे येथून विट्याकडे येत होते. त्यावेळी नेवरी गावाजवळ या दोन कारची समोरासमोर धडक झाली.ही धडक इतकी भीषण होती की, मोटारीतील कपिल व त्यांची पत्नी धनश्री झांबरे यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या मोटारीतील सुदर्शन निकम हा तरुण गंभीर जखमी झाला. त्याच्यावर कराड येथे उपचार सुरू असताना शुक्रवारी सकाळी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात डोंगरसोनी येथील प्रज्वल झांबरे हे जखमी झाले असून त्यांच्यावर सांगली येथे उपचार सुरू आहेत. तर संग्राम गायकवाड हे किरकोळ जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच विटा व कडेगाव पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. अपघातातील पती- पत्नीचे मृतदेह विटा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. तर जखमींना पुढील उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले.या अपघातात दुर्दैवी अंत झालेले कपिल व त्यांच्या पत्नी धनश्री झांबरे या उच्चशिक्षित आहेत. कपिल हे अन्न व औषध प्रशासन विभागात अधिकारी म्हणून काम पाहत होते. त्यांनी नुकतीच इस्रोची परीक्षा दिली होती. या परीक्षेत त्यांना यश मिळाल्याने त्यांची निवड दिल्ली येथे इस्रोमध्ये झाली होती. तर त्यांच्या पत्नी धनश्री या अभियंता आहेत. या अपघातात ठार झालेले विटा येथील सुदर्शन निकम हे कॉन्ट्रॅक्टर गजानन निकम यांचे चिरंजीव आहेत. या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

टॅग्स :SangliसांगलीAccidentअपघातDeathमृत्यू