शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवाद्यांशी चकमक; दोन गोळ्या मांडीत घुसल्या, तरीही सहकाऱ्याला वाचविले; सांगली जिल्ह्यातील जवानाची शौर्यगाथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 15:38 IST

जखमी सहकाऱ्याला खांद्यावर उचलले अन् वेदना सहन करीत डोंगरावरून तो खाली छावणीपर्यंत पोहोचला

महेश देसाईकवठेमहांकाळ (जि. सांगली) : दहशतवाद्यांनी झाडलेल्या दोन गोळ्या मांडीत घुसल्या अन् तो रक्तबंबाळ झाला. सोबत असलेल्या सहकारी जवानाला छातीत गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला होता. तिसऱ्या सहकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला आणि दहशतवाद्यांचा गोळीबार सुरूच होता.तरीही त्याने जखमी सहकाऱ्याला खांद्यावर उचलले अन् वेदना सहन करीत डोंगरावरून तो खाली छावणीपर्यंत पोहोचला. कुकटोळी (ता. कवठेमहांकाळ) येथील येथील विनोद चव्हाण याची ही शौर्यगाथा तालुक्यात चर्चेचा विषय बनली आहे. चव्हाण व त्याचा जखमी सहकारी प्रदीप कुमार यांची प्रकृती आता स्थिर असल्याचे सांगण्यात आले.कुकटोळी येथील विनोद सुनील चव्हाण (वय २६) हे सध्या जम्मू-काश्मीरमध्ये राष्ट्रीय रायफल्स, मराठा बटालियनमध्ये कार्यरत आहेत. त्यांचे वडीलही मराठा बटालियनमध्ये सैनिक होते. सध्या ते सेवानिवृत्त आहेत. जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात सिंगपोरा येथे संयुक्त सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत गुरुवारी, दि. २२ रोजी पहाटे ५ ते ६ वाजण्याच्या सुमारास हा हल्ला झाला. यावेळी जवान संदीप पांडुरंग गायकर हे शहीद झाले, तर कुकटोळी येथील विनोद चव्हाण व उत्तर प्रदेशमधील प्रदीप कुमार हे त्यांचे सहकारीही जखमी झाले.दहशतवाद्यांना रोखण्यासाठी आणि ते पळून जाऊ नयेत, यासाठी घेराबंदी कडक करण्यात आली होती. डोंगरावर लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी संयुक्त दल जवळ येताच गोळीबार सुरू केला. यावेळी विनोदने ४८ गोळ्या झाडल्या होत्या. या चकमकीत विनोद यांना मांडीत दोन गोळ्या लागल्या होत्या, तर प्रदीप कुमार यांना छातीत एक गोळी लागली होती. दोघांवर जम्मू-काश्मीरमधील कमांडो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून, ते दोघेही सुखरूप आहेत.

टॅग्स :SangliसांगलीJammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादीIndian Armyभारतीय जवान