शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील धुळकरवाडीत वीज पडून दोन म्हैशी ठार; मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2023 18:20 IST

दरीबडची : जत तालुक्यातील धुळकरवाडी परीसरात आज, गुरुवारी पहाटेच्या सुमारास वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह वळीव पावसाने हजेरी लावली होती. रात्रीच्या सुमारास ...

दरीबडची : जत तालुक्यातील धुळकरवाडी परीसरात आज, गुरुवारी पहाटेच्या सुमारास वादळी वारे, विजेच्या कडकडाटासह वळीव पावसाने हजेरी लावली होती. रात्रीच्या सुमारास जोरदार विजेच्या कडकडाट झाला. दरम्यान, वीज पडून दोन म्हैशी ठार झाल्या. यादुर्घटनेत ईश्वर आप्पाराया करे यांचे अंदाजे ८० हजार रुपयाचे नुकसान झाले. पूर्व भागातील धुळकरवाडी येथील ईश्वर करे हे कुंटुंबासह कर्नाटकातील हुबनूर गावाच्या सीमेलगतच्या शेतात राहतात. त्यांचा पशुपालनाचा व्यवसाय आहे. त्यांनी घरासमोर बाभूळीच्या झाडाला दोन म्हैशी बांधल्या होत्या. आज, सकाळच्या सुमारास अचानक विजाच्या कडकडाटासह वळीव पावसाने जोरदार हजेरी लावली. यावेळी वीज पडून करे यांच्या दोन म्हैशी ठार झाल्या. सुदैवाने दुसऱ्या झाडाला बांधलेल्या दोन म्हैशी बचावल्या. मात्र या दुर्घटनेत करे यांचे मोठे नुकसान झाले.धुळकरवाडी वीज पडून जनावरे दगावल्याची ही दुसरी घटना आहे. याआधी सुखदेव सोमा शिंदे यांच्या दोन जर्सी गाई २९ एप्रिलला वीज पडून ठार झाल्या होत्या. आठवडाभरानंतर ही दुसरी घटना घडली आहे.या घटनेनंतर तलाठी, कोतवाल, पशुसंवर्धन विस्तार अधिकारी, पशुवैद्यकीय पर्यवेक्षक यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला. पुढील कारवाईसाठी अहवाल संख येथील अप्पर तहसिलदार कार्यालयाकडे पाठविला आहे. 

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊस