कवठेमहांकाळला दोन सख्ख्या भावांचा कोरोनाने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:33 IST2021-04-30T04:33:55+5:302021-04-30T04:33:55+5:30
कवठेमहांकाळ : तालुक्यातील दोन सख्खे भाऊ चार दिवसांपूर्वी कोरोनाग्रस्त आढळले होते. त्यातील एकावर मिरज येथे तर एकावर कवठेमहांकाळ येथे ...

कवठेमहांकाळला दोन सख्ख्या भावांचा कोरोनाने मृत्यू
कवठेमहांकाळ : तालुक्यातील दोन सख्खे भाऊ चार दिवसांपूर्वी कोरोनाग्रस्त आढळले होते. त्यातील एकावर मिरज येथे तर एकावर कवठेमहांकाळ येथे उपचार सुरू होते. गुरुवारी या दोघांचाही मृत्यू झाल्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
तालुक्यात कोरोनाने हाहाकार माजवला असून, फेब्रुवारीपासून आजअखेर १ हजार ४५ रुग्ण आढळले आहेत. यामध्ये तब्बल ६३४ रुग्ण उपचार घेत आहेत. गुरुवारी तालुक्यात सख्ख्या भावांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तालुक्यातील कोरोनाचे प्रमाण वाढतच आहे. नागज, कदमवाडी, रांजणी, ढालगाव, कवठेमहांकाळ शहर येथे कोरोनाने विळखा घातला आहे. नागज येथे आठ दिवसांसाठी पूर्णपणे बंद पाळण्यात आला आहे. तालुक्यातील इतर गावांमध्येही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत.
यावर्षी तालुक्यात कोरोनाने अवघ्या दीड महिन्यात २९ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचे प्रमाण तालुक्यात वाढत असताना यावर उपचार करणारी यंत्रणा मात्र तोकडी आहे. ऑक्सिजनचे ४० बेड आहेत तर आयसीयू बेड फक्त सहा आहेत. चार ते पाच बेड व्हेंटिलेटरचे आहेत. त्यामुळे वाढत्या रुग्णांना बेड मिळणे महाकठीण झाले आहे. ढालगाव परिसरात रुग्णवाढीचे प्रमाण अधिक असल्याचे समोर आले आहे.