इस्लामपुरात मारहाण करणाऱ्या दोघांना कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:18 IST2021-06-21T04:18:27+5:302021-06-21T04:18:27+5:30
इस्लामपूर : येथील कापूसखेड रस्त्यावरील स्मशानभूमीलगत असणाऱ्या घरकुल योजनेच्या परिसरात पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून एकाचे विटेने डोके फोडून ...

इस्लामपुरात मारहाण करणाऱ्या दोघांना कोठडी
इस्लामपूर : येथील कापूसखेड रस्त्यावरील स्मशानभूमीलगत असणाऱ्या घरकुल योजनेच्या परिसरात पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून एकाचे विटेने डोके फोडून त्याला गंभीर जखमी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. येथील न्यायालयाने दोघांनाही दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यातील अन्य दोघे पसार झाले असून, ही घटना शुक्रवारी दुपारी घडली होती.
शंकर संपत साळुंखे (२६, रा. कापूसखेड) असे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून, त्याच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी पुष्पक प्रकाश नायकवडी (२२, कापूसखेड) आणि सुरज राजाराम बाबर (२१, उदय चौक, इस्लामपूर) या दोघांना अटक केली आहे.
शंकर साळुंखे आणि चौघे हल्लेखोर हे घरकुल इमारत परिसरात दारू पित बसले होते. काहीवेळाने पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून पुष्पक नायकवडी याने साळुंखे याच्या डोक्यात वीट मारून त्याला जखमी केले. यावेळी साळुंखे याने आपले मित्र अनिकेत धुमाळ आणि आनंदा कोळी यांना बोलावून घेतले होते. त्यावर साळुंखेच्या दोन मित्रांनाही हल्लेखोरांनी मारहाण व शिवीगाळ केली. हवालदार अमोल चव्हाण अधिक तपास करत आहेत.