विट्यात गावठी पिस्तूलसह दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:37 IST2020-12-30T04:37:05+5:302020-12-30T04:37:05+5:30

सचिन चव्हाण व अजित चव्हाण गावठी बनावटीचे पिस्तूल व काडतुसे विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांना ...

Two arrested with village pistols in Vita | विट्यात गावठी पिस्तूलसह दोघांना अटक

विट्यात गावठी पिस्तूलसह दोघांना अटक

सचिन चव्हाण व अजित चव्हाण गावठी बनावटीचे पिस्तूल व काडतुसे विकण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके यांना मिळाल्यानंतर त्यांनी विटा ते तासगाव रस्त्यावरील एस्सार पेट्रोल पंपाजवळ सापळा लावला. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सचिन व अजित चव्हाण पेट्रोल पंपाजवळ आले. त्यावेळी पोलीस पथकाने त्यांच्यावर छापा टाकून या दोघांना ताब्यात घेतले.

यावेळी पोलिसांनी संशयितांच्या ताब्यातील ३० हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे पिस्तूल, एक हजार रुपये किमतीची दोन काडतुसे व ६० हजार रुपये किमतीची दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला. विनापरवाना शस्त्र बाळगून त्याची विक्री करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांना अटक केली.

फोटो : विटा पोलिसांनी विहापूरच्या दोघांना अटक करून त्यांच्या ताब्यातील गावठी बनावटीचे पिस्तूल व काडतुसे जप्त केली.

फोटो : सचिन चव्हाण.

फोटो : अजित चव्हाण.

Web Title: Two arrested with village pistols in Vita