मिरजेत घोरपडीची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:29 IST2021-05-27T04:29:34+5:302021-05-27T04:29:34+5:30

मिरज : मिरजेतील रेवणी गल्ली परिसरात घोरपडीची विक्री करणाऱ्या बीड येथील दोघांना पीपल्स फॉर ॲनिमलच्या कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात ...

Two arrested for smuggling Ghorpadi in Miraj | मिरजेत घोरपडीची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक

मिरजेत घोरपडीची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक

मिरज : मिरजेतील रेवणी गल्ली परिसरात घोरपडीची विक्री करणाऱ्या बीड येथील दोघांना पीपल्स फॉर ॲनिमलच्या कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांच्या ताब्यातून एक मृत व एक जिवंत घोरपड जप्त केली. वन्यप्राण्यांची तस्करी करणाऱ्या बाबा अब्दुल शेख, वय ४०, राजाभाऊ सुंदर केदार, वय ३६, रा. एकोरगाव, बीड या दोघांना पोलिसांनी अटक केली.

मिरजेत रेवणी गल्ली परिसरात घोरपडची विक्री करण्यासाठी आल्याची माहिती पीपल्स फॉर ॲनिमलच्या कार्यकर्त्यांना मिळाली. ॲड. बसवराज होसगौडर, अशोक लकडे व नदाफ यांनी तीन हजार रुपयांना घोरपडीचा साैदा ठरवून दोघांना पकडून त्यांना मिरज शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यांच्याकडे एक जिवंत घोरपड, एक मृत घोरपड सापडली. दोघे जण घोरपडी पकडून सातशे रुपये प्रतिकिलोप्रमाणे मांस विक्री करीत असल्याचे निष्पन्न झाले. याबाबत मिरज शहर पोलिसांत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Two arrested for smuggling Ghorpadi in Miraj