सांगलीत मोका कारवाईतील दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:21 IST2021-01-14T04:21:24+5:302021-01-14T04:21:24+5:30

सांगली : खुनाच्या गुन्ह्यामध्ये मोका कायद्यांतर्गत कारवाई झाल्यानंतर पसार असलेल्या दोघांना अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या ...

Two arrested in Sangli Moka operation | सांगलीत मोका कारवाईतील दोघांना अटक

सांगलीत मोका कारवाईतील दोघांना अटक

सांगली : खुनाच्या गुन्ह्यामध्ये मोका कायद्यांतर्गत कारवाई झाल्यानंतर पसार असलेल्या दोघांना अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने वैभव रमेश बाबर (वय ५५, रा. माहेश्‍वरी गार्डन, कर्नाळ प्लॉट, सांगली) व रविराज शंकर जाधव (वय २५, जुना स्टेशन रस्ता, सांगली) अशी त्या दोघांची नावे आहेत. २०१९ मध्ये झालेल्या महेश नाईक खून प्रकरणात संशयितांचा सहभाग होता, अशी माहिती एलसीबीचे निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

अधिक माहिती अशी की, शहरातील महावीर कॉलनीमध्ये महेश शिवाजी नाईक (वय २५, गुलाब कॉलनी, सांगली) या युवकाचा खून वर्चस्वातून १० एप्रिल २०१९ रोजी खून करण्यात आला होता. या घटनेनंतर खुनात संशयित असलेल्या ११ जणांवर मोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती. मोकांतर्गत कारवाई झाल्यापासून संशयित पसार होते.

पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम, अपर अधीक्षक मनीषा दुबुले यांनी पसार संशयितांचा शोध घेण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, एलसीबीच्या खास पथकाने केलेल्या कारवाईत गोकुळनगर कॉर्नर येथे कारवाई करत दोघांना ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणाचा तपास मिरजचे पोलीस उपाधीक्षक अशोक वीरकर करत असल्याने संशयितांना त्यांच्या ताब्यात देण्यात आले असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले.

Web Title: Two arrested in Sangli Moka operation