शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

खुनी हल्ल्यातील संशयितांचा तत्काळ छडा, दोघांना अटक; पूर्ववैमनस्यातून हल्ला केल्याचे स्पष्ट

By घनशाम नवाथे | Updated: February 29, 2024 17:08 IST

रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रशांत विश्वनाथ कदम याच्यावर केला होता खुनी हल्ला

सांगली : येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रशांत विश्वनाथ कदम (वय ४०, रा. खणभाग) याच्यावर खुनी हल्ला केल्याप्रकरणी संशयित आदित्य उर्फ मॅक्सी रमेश भारती (वय १९, तिवारी गल्ली), आर्यन चंद्रकांत देशमुख (वय १८, पाटणे गल्ली) या दोघांना शहर पोलिसांनी अटक केली. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला केल्याची दोघांनी कबुली दिली आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संशयित आदित्य भारती याचे वडील रमेश भारती आणि जखमी प्रशांत कदम हे काही दिवसांपूर्वी मद्यप्राशन करण्यास बसले होते. तेव्हा भारती यांचा हृदयविकाराच्या धक्कयाने मृत्यू झाला. परंतू भारती यांच्या मृत्यूबद्दल आदित्य याला प्रशांतवर संशय होता. त्यामुळे तो प्रशांतवर चिडून होता. त्यांच्यात वादही झाला होता. दि. २८ रोजी रात्री साडे नऊच्या सुमारास प्रशांत हा खणभागातील ओंकार कट्टयावर बसला होता. तेव्हा जुन्या भांडणाचा राग मनात धरून आदित्य व आर्यन या दोघांनी प्रशांतचा खून करण्याच्या उद्देशाने धारदार शस्त्राने त्याच्या डोक्यावर वार करण्यास सुरवात केली. डोके वाचवण्यासाठी त्याने हात डोक्यावर घेतले. त्यामुळे हातावर वार होऊन तो जखमी होऊन खाली पडला. तेव्हा दोघांनी त्याच्या पायावर व पोटावरही वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर दोघेजण अंधारात पळून गेले.सांगली शहर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा याबाबत रेखा योगेश पवर (वय ४३, रा. हनुमाननगर, कुपवाड) यांनी फिर्याद दिली. याचा तपास करताना दोघे संशयित धामणी रस्त्यावरील उष:काल हॉस्पिटलजवळ लपून बसल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तेथे जाऊन पाहणी केली. तेव्हा दोघेजण अंधारात लपून बसल्याचे दिसले. दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी खुनी हल्ल्याची कबुली दिली.

पोलिस निरीक्षक संजय मोरे यांच्या सुचनेनुसार उपनिरीक्षक महादेव पोवार, अंमलदार संदीप पाटील, विनायक शिंदे, सचिन शिंदे, रफीक मुलाणी, संतोष गळवे, गौतम कांबळे, संदीप कुंभार, गणेश कांबळे, योगेश सटाले, सुमित सूर्यवंशी, पृथ्वीराज कोळी, कॅप्टन गुंडवाडे यांच्या पथकाने कारवाई केली.

सज्ञात झाला गुन्ह्यात अडकलासंशयित आर्यन याला १८ वर्षे पूर्ण होऊन अवघा एक महिना झाला. त्यामुळे कायदेशीरदृष्ट्या तो सज्ञान समजला जातो. खुनी हल्ल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा नोंद झाला आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस