आयपीएल सामन्यांवर बेटिंग घेणाऱ्या दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:24 IST2021-04-26T04:24:17+5:302021-04-26T04:24:17+5:30

सांगली : आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टा घेणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. अमित संजय अहिवळे (वय २३, रा. विठ्ठल कॉलनी, ...

Two arrested for betting on IPL matches | आयपीएल सामन्यांवर बेटिंग घेणाऱ्या दोघांना अटक

आयपीएल सामन्यांवर बेटिंग घेणाऱ्या दोघांना अटक

सांगली : आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टा घेणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. अमित संजय अहिवळे (वय २३, रा. विठ्ठल कॉलनी, शामरावनगर,सांगली) आणि अवधूत राजेंद्र चौधरी (२३, रा. माधवनगर रोड,सांगली) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून रोख ५ हजार रुपयांसह ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सध्या सुरू असलेल्या आयपीएल क्रिकेट सामन्यांवर बेटिंग घेण्यात येत असल्याची माहिती विश्रामबाग पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शहरातील पुष्पराज चौक परिसरात असलेल्या मंगलधाम इमारतीच्या बोळात दोघेजण दुचाकीवर बसून मोबाईलद्वारे सट्टा घेत होते. विश्रामबाग पोलिसांच्या पथकाने छापा टाकून त्यांची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडे बेटींगच्या चिठ्ठया व मुद्देमाल मिळाला. त्यांच्याकडून रोख ५ हजार रूपयांसह दोन मोबाईल, दोन दुचाकी असा ७५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अमितकुमार पाटील, आदिनाथ माने, व्ही. यु. मुंढे, संदीप घस्ते आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: Two arrested for betting on IPL matches