बनेवाडीतील खुनी हल्लाप्रकरणी दोघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:20 IST2021-02-20T05:20:34+5:302021-02-20T05:20:34+5:30

इस्लामपूर : बनेवाडी (ता. वाळवा) येथे किरकोळ कारणातून तिघांवर खुनी हल्ला करणाऱ्या दोघा भावांना अटक करण्यात आली ...

Two arrested in Banewadi murder case | बनेवाडीतील खुनी हल्लाप्रकरणी दोघांना अटक

बनेवाडीतील खुनी हल्लाप्रकरणी दोघांना अटक

इस्लामपूर : बनेवाडी (ता. वाळवा) येथे किरकोळ कारणातून तिघांवर खुनी हल्ला करणाऱ्या दोघा भावांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी या दोघांना न्यायालयासमोर उभे केल्यावर न्यायालयाने दोघांना २२ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

सुहास एकनाथ यादव आणि जितेंद्र एकनाथ यादव अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. या घटनेतील सुनीता सुहास यादव व कविता जितेंद्र यादव या दोघींना अटक करण्यात आलेली नाही. याबाबत सुमित संजय यादव याने चौघांविरुद्ध फिर्याद दिली आहे.

बुधवारी सकाळी दुचाकीला ट्रॅक्टर आडवा मारल्याचा जाब विचारला म्हणून वरील चौघांनी सुमित यादव, रोहित सुरेश यादव, प्रतीक विजय यादव यांच्यावर खुनी हल्ला केला. सहायक पोलीस निरीक्षक गणेशप्रसाद भरते अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Two arrested in Banewadi murder case