अडीच हजार किलो प्लास्टिकला मिळणार पुनर्जन्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:28 IST2021-08-23T04:28:52+5:302021-08-23T04:28:52+5:30
सांगली : गेल्या ६ महिन्यांपासून संकलित केलेले सुमारे अडीच टन प्लास्टिक पुनर्प्रक्रियेसाठी पुण्याला पाठवण्यात आले. निसर्गसंवाद, वेस्टकार्ट संस्थांसह ...

अडीच हजार किलो प्लास्टिकला मिळणार पुनर्जन्म
सांगली : गेल्या ६ महिन्यांपासून संकलित केलेले सुमारे अडीच टन प्लास्टिक पुनर्प्रक्रियेसाठी पुण्याला पाठवण्यात आले. निसर्गसंवाद, वेस्टकार्ट संस्थांसह पर्यावरणप्रेमींनी प्लास्टिकमुक्त शहर मोहिमेअंतर्गत संकलन केले होते.
ऐन कोविड काळातच मोहिमेला सुरुवात झाली होती. सुरुवातीला ६०-७० घरांपासून सुरू झालेले आपले अभियान कोविड आणि पूर परिस्थितीनंतरही सुरूच राहिले. आजमितीस ६०० घरांमधून टाकाऊ प्लास्टिक संकलित केले जाते. एकदाच वापरण्याजोगे प्लास्टिक फेकून न देता पुनर्प्रक्रियेसाठी आवाहनाला सजग नागरिकांनी प्रतिसाद दिला. सहा महिन्यांत २ हजार ६१५ किलो प्लास्टिक गोळा झाले.
पुण्यात त्याच्यावर पुनर्प्रक्रिया केली जाईल. पुणेस्थित इकोटेक संस्थेने हे आव्हान स्वीकारले आहे. कार्यकर्ते हिमांशू लेले यांनी सांगितले की, प्लास्टिक संकलनाची मोहीम सुरूच राहणार असून शहरे प्लास्टिकमुक्त करण्याचे ध्येय आहे. नागरिकांनी प्लास्टिकचा वापर टाळावा किंवा पुनर्प्रक्रिया करता येण्याजोगे प्लास्टिक वापरावे.