तडवळे कारवाईच्या धाकाने अडीच लाखांची वसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:24 IST2021-03-28T04:24:46+5:302021-03-28T04:24:46+5:30

शिराळा : तडवळे (ता. शिराळा) येथील थकबाकी वसुलीसाठी ४५ जणांचे नळ कनेक्शन बंद करण्यात आले असून या कारवाईच्या धसक्याने ...

Two and a half lakhs were recovered due to immediate action | तडवळे कारवाईच्या धाकाने अडीच लाखांची वसुली

तडवळे कारवाईच्या धाकाने अडीच लाखांची वसुली

शिराळा

: तडवळे (ता. शिराळा) येथील थकबाकी वसुलीसाठी ४५ जणांचे नळ कनेक्शन बंद करण्यात आले असून या कारवाईच्या धसक्याने एकाच दिवशी २ लाख ६५ हजार ८७० रुपये वसुली झाली आहे.

तडवळे येथे पंचायत समितीकडून वसुली पथक स्थापन केले आहे. गावात यंदाचे व थकीत घटपट्टी, पाणीपट्टी सुमारे १६ लाख रुपये इतकी आहे. वसुली पथकाने एकाच दिवशी ४५ नळ कनेक्शन बंद केले. त्यापैकी दोन लाख ६५ हजार ८७० वसूल करण्यात आली.

या पथकामध्ये विस्तार अधिकारी रवींद्र मटकरी, ग्रामसेवक अमोल बाबर, कुमार भिंगारदिवे, ग्राम विकास अधिकारी रमेश पाटील, दिग्विजय राऊत, महेश भोई, सतीश पाटील, सुधीर पाटील, राजू कांबळे, राजू काळे, सचिन मोरे, विकास वनारे, वसंत इंगवले आदींचा समावेश आहे. गटविकास अधिकारी अनिल बागल व सहाय्यक गटविकास अधिकारी अरविंद माने यांनी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.

Web Title: Two and a half lakhs were recovered due to immediate action