मोबाईल हॅक करून अडीच लाख लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:26 IST2021-09-19T04:26:53+5:302021-09-19T04:26:53+5:30

रामचंद्र मगदूम हे नोकरी करतात. त्यांचे व त्यांच्या पत्नीचे पगाराचे व संयुक्त खाते आहे. चार दिवसांपूर्वी ...

Two and a half lakh lamps hacked by mobile | मोबाईल हॅक करून अडीच लाख लंपास

मोबाईल हॅक करून अडीच लाख लंपास

रामचंद्र मगदूम हे नोकरी करतात. त्यांचे व त्यांच्या पत्नीचे पगाराचे व संयुक्त खाते आहे. चार दिवसांपूर्वी मगदूम यांच्या मोबाईलवर अज्ञात व्यक्तीचा दोन वेगवेगळ्या क्रमांकावरून फोन आला. त्याने रामचंद्र मगदूम यांचा मोबाईल हॅक करून त्यांच्या बँकेतील दोन्ही खात्यांवरील दोन लाख, तीस हजार रुपये रक्कम काढली. रक्कम काढल्याचा मेसेज मोबाइलवर आल्यानंतर फसवणूक झाल्याचे मगदूम यांच्या लक्षात आले.

याबाबत मगदूम यांनी मिरज ग्रामीण पोलिसांत फिर्याद दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. अनोळखी नंबरवरून वेगवेगळ्या बहाण्याने पासवर्ड व पिन क्रमांक विचारून गंडा घालण्यात येत आहे. मात्र मोबाईल हॅक करून ऑनलाइन फसवणुकीचेही प्रकार सुरू झाले आहेत. भामटे बँक खात्यावरच थेट डल्ला मारत आहेत. त्यामुळे अज्ञाताचा फोन, इंटरनेट लिंक, वेबसाईट यांना प्रतिसाद देऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Web Title: Two and a half lakh lamps hacked by mobile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.