अडीच लाख बालकांना देणार ‘दो बॅूंद जिंदगी के’, उद्या पोलिओ लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:32 IST2021-02-05T07:32:29+5:302021-02-05T07:32:29+5:30
सांगली : पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत रविवारी (दि. ३१) जिल्ह्यात अडीच लाख बालकांना लस देण्यात येणार आहे. आरोग्य यंत्रणेने त्याची ...

अडीच लाख बालकांना देणार ‘दो बॅूंद जिंदगी के’, उद्या पोलिओ लसीकरण
सांगली : पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत रविवारी (दि. ३१) जिल्ह्यात अडीच लाख बालकांना लस देण्यात येणार आहे. आरोग्य यंत्रणेने त्याची जय्यत तयारी केली आहे. यासंदर्भात शुक्रवारी सकाळी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली.
लसीकरणासाठी जिल्ह्याची १ जानेवारीची मध्यवर्ती लोकसंख्या लक्षात घेऊन बुथ निश्चित केले आहेत. त्यानुसार ग्रामीण भागाची लोकसंख्या २१ लाख ३६ हजार ५६, तर शहरी भागाची २ लाख ११ हजार ६८३ आहे. महापालिका क्षेत्राची लोकसंख्या ५ लाख ४२ हजार ७१७ आहे. ग्रामीण भागात ० ते ५ वर्षे वयोगटात १ लाख ६९ हजार ७६० बालके आहेत. शहरी भागात १७ हजार ३१०, तर महापालिका क्षेत्रात ६१ हजार ७७१ बालके आहेत.
लसीकरणासाठी जिल्हास्तरापासून पर्यवेक्षकांपर्यंत २२ डिसेंबर ते ७ जानेवारी या कालावधीत टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण झाले. १५० पर्यंत बालके नोंद असलेल्या केंद्रावर दोन, तर अन्य केंद्रांवर तीन लसपाजक असतील. शिवाय आरोग्यसेवक, पर्यवेक्षक, लेखनिक, केंद्रप्रमुख, स्वयंसेवक असे एकूण ५ हजार ३१० जण मोहिमेत सहभागी होतील. लसीची गुणवत्ता कायम राखण्यासाठी शीतसाखळी राखत ग्रामीण भागापर्यंत लस पोहोचविली जात असल्याचे जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. मिलिंद पोरे म्हणाले. लस घेण्यासाठी कोणत्याही बालकाला दोन किलोमीटरपेक्षा दूर जावे लागणार नाही याची दक्षता घेतली आहे.
पॉईंटर्स
- ० ते ५ वर्षे वयोगटातील एकूण बालके : २ लाख ४८ हजार ८४१
- एकूण बुथ : २२१४
- लसीकरणासाठी मिळालेले डोस : ३५,१४६०
- आरोग्यसेवक - ४९०
- पर्यवेक्षक - १७
- आरोग्य संस्था - ९९
- मोबाईल पथके - २६५
- ट्रांझिट पथके - १७३
- वेळ : सकाळी ८ ते सायंकाळी ५
कोट
- पोलिओ लसीकरणाची सर्व तयारी झाली आहे. लाभार्थी संख्येपेक्षा जास्त डोस जिल्ह्याला मिळाले आहेत. लसीकरणापासून एकही बालक वंचित राहू नये याची दक्षता घेण्यात येत आहे. शंभर टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी शनिवारपासून कोरोनाचे लसीकरण बंद ठेवले आहे.
- डॉ. मिलिंद पोरे, प्रभारी जिल्हा आरोग्याधिकारी.
----------------