जिल्हाभरात अडीच लाख बालकांना पोलिओची लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:32 IST2021-02-05T07:32:11+5:302021-02-05T07:32:11+5:30
म्हैसाळ येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी जिल्हास्तरीय पोलिओ लसीकरण मोहिमेचा प्रारंभ केला. यावेळी डॉ. ...

जिल्हाभरात अडीच लाख बालकांना पोलिओची लस
म्हैसाळ येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांनी जिल्हास्तरीय पोलिओ लसीकरण मोहिमेचा प्रारंभ केला. यावेळी डॉ. मिलिंद पोरे, नंदकुमार कोरे, डॉ. विजय सावंत आदी उपस्थित होते.
फोटो ३१ शीतल ०१
महापालिका क्षेत्रात महापौर गीता सुतार यांनी साखऱ् कारखाना आरोग्य केंद्रात लसीकरणाचा प्रारंभ केला. यावेळी विनायक सिंहासने, डॉ. सुनील आंबोळे आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : पोलिओ लसीकरण मोहिमेचा जिल्हास्तरीय प्रारंभ म्हैसाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्याहस्ते झाला. यावेळी मिरज पंचायत समितीच्या सभापती त्रिशला खवाटे, सदस्य दिलीप पाटील, प्रभारी जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. मिलिंद पोरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय सावंत, नंदकुमार कोरे, प्रमोद खवाटे, डॉ. नंदकुमार खंदारे, नामदेव पवार, श्यामराव इंगळे, सुरेश कांबळे, शिवाजी खाडे, बाबासाहेब माळी आदी उपस्थित होते.
रांजणी येथे आरोग्य समिती सभापती आशा पाटील यांच्याहस्ते लसीकरणाचा प्रारंभ झाला. यावेळी पंचायत समितीच्या उपसभापती नीलम पवार, उपसरपंच हनुमंत देसाई, उदय भोसले, माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. विवेक पाटील, तालुका आरोग्याधिकारी डॉ. दत्तात्रय पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ. शारदा पाटील, प्रदीप शिरोटे आदी उपस्थित होते.
जिल्ह्यात २२१४ बुथ, १७३ ट्रान्झीट पथके, २६५ मोबाईल पथकांद्वारे अडीच लाख बालकांना लस देण्यात आली.
चौकट
महापालिका क्षेत्रात ४८ हजार बालकांना लस
महापालिका क्षेत्रात साखर कारखाना आरोग्य केंद्रात मोहिमेचा प्रारंभ महापौर गीता सुतार यांनी केला. यावेळी आयुक्त नितीन कापडणीस व आरोग्याधिकारी उपस्थित होते. ४९६ बुथवर लस देण्यात आली. घरभेटीसाठी २१५ पथके नियुक्त केली आहेत. ० ते ५ वर्षे वयोगटातील ४८५७५ बालकांना त्यांनी लस दिली.
प्रारंभप्रसंगी गटनेते विनायक सिंहासने, नगरसेविका शुभांगी साळुंखे, कांचन कांबळे, संजय कुलकर्णी, वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉ. सुनील आंबोळे, डॉ. वैभव पाटील, डॉ. वैशाली पाटील, डॉ. संग्राम पाटील, डॉ. वैशाली शिंदे, समर पवार आदी उपस्थित होते.
--------