शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Crime: परताव्याला भुलले.. इस्लामपुरातील बारा जणांची एक कोटी ३६ लाख रुपयांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2025 13:04 IST

१० जणांच्या ठकबाज टोळीविरुद्ध गुन्हा दाखल

इस्लामपूर (जि. सांगली) : फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक करून जादा परतावा देण्याचे आमिष दाखवत ठकबाज टोळीने इस्लामपूर शहरातील १२ जणांना तब्बल १ कोटी ३६ लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली. फसवणुकीचा हा प्रकार एप्रिल २२ ते एप्रिल २०२४ या कालावधीत घडला आहे.याबाबत संतोष बाळासाहेब पाटील (३८, रा. किसाननगर-इस्लामपूर) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विराज सुहास पाटील (दहिसर-मुंबई), फॉरेक्स ट्रेडिंग कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी जोसेफ, प्रियंका खन्ना (दोघे रा. पंजाब), डॉ. नीलेश नरेशराव राऊत, सूरज सुधाकर सावरकर, सुरेंद्र मधुकर सावरकर (रा. झडशी टाकळी, जि. वर्धा), प्रीती नीलेश राऊत (वर्धा), सॅविओ परेरा (रा. विरार वेस्ट, जि. पालघर) व इतर ब्रोकर आणि एजंट अशा १० हून अधिक जणांच्या टोळीविरुद्ध फसवणुकीसह महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधांचे संरक्षण कायद्याखाली गुन्हा नोंद केला आहे. 

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, वरील भामट्यांच्या टोळीने इस्लामपूर शहरातील दोन पॉश हॉटेलमध्ये गुंतवणूक करण्यासाठीची चर्चासत्रे घेत संतोष पाटील यांच्यासह अन्य १२ जणांचा विश्वास संपादन करत आपल्या जाळ्यात ओढले. या सर्वांना फॉरेक्स ट्रेडिंगच्या विविध ॲप आणि वेबसाइटवर गुंतवणूक केल्यास जादा परतावा देण्याचे आमिष दाखवले. त्याला हे १२ जण फशी पडले.गुंतवणूकदारांना ठकबाजांचा ठेंगाएप्रिल २२ ते एप्रिल २०२४ या दोन वर्षांच्या काळात या सर्वांनी तब्बल १ कोटी ३६ लाख २२ हजार रुपयांची गुंतवणूक या भामट्यांच्या टोळीने सांगितलेल्या विविध बँक खात्यावर केली. गुंतवणूक केल्यानंतर त्याचा परतावा मिळण्यासाठी या सर्वांनी तगादा लावला होता. मात्र त्यांना या ठकबाजांनी ठेंगा दाखवल्यावर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे शहरातील या सर्वांनी पोलिसात धाव घेतली.