शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

हळद व्यापाऱ्याने शेतकऱ्यांना घातला दोन कोटींचा गंडा, अटकेच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा शंखध्वनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2022 17:14 IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी मोर्चा काढून सारडांच्या घरासमोर शंखध्वनी आंदोलन केले.

सांगली : सांगलीतील वाखरभागमधील हळद व्यापारी राजकुमार सारडा यांनी शेतकऱ्यांना दोन कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी मोर्चा काढून सारडांच्या घरासमोर शंखध्वनी आंदोलन केले. शेतकऱ्यांनी ठिय्या मारला होता. तत्काळ पैसे दिले नाही तर सारडा यांच्यावर गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही आंदोलकांनी केली.स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांनी आंदोलन केले. पटेल चौकातून मोर्चाची सुरुवात झाली. सारडा यांच्या निषेधाच्या घोषणा देत वखारभागमधील त्यांच्या बंगल्यासमोर मोर्चा आल्यानंतर शेतकऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शंखध्वनी आंदोलन केले.यावेळी झालेल्या सभेत महेश खराडे म्हणाले की, सारडा यांनी चार वर्षांपूर्वी वाई, कोरेगावसह सातारा जिल्ह्यातील २०० शेतकऱ्याची हळद खरेदी केली. सर्व शेतकऱ्यांची सुमारे दोन कोटी रुपये इतकी रक्कम आहे. गेल्या चार वर्षांत एक रुपयाही सारडा यांनी शेतकऱ्यांना दिलेली नाही. त्यांनी शेतकऱ्यांना दिलेले धनादेश वटलेच नाहीत. या व्यापाऱ्याच्या मनमानीमुळे शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे सारडा यांनी तात्काळ पैसे द्यावेत अन्यथा घरात ठिय्या मारू, असा इशारा त्यांनी दिला.

यावेळी महेश जगताप, संदीप शीरोटे, रितेश साळोखे, शशिकांत जाधव, राहुल साबळे, रमेश भोसले, रवींद्र बोराटे, विजय धनवडे, जयवंत मटकर आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Sangliसांगली