तुपारीत क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:25 IST2021-03-24T04:25:35+5:302021-03-24T04:25:35+5:30
बोरगाव : तुपारी (ता. पलूस) येथे झुंजार युवा प्रतिष्ठानतर्फे माजी सरपंच पोपटभाऊ विलास अपरंपार-पाटील यांच्या स्मरणार्थ भव्य नाईट टेनिस ...

तुपारीत क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण
बोरगाव : तुपारी (ता. पलूस) येथे झुंजार युवा प्रतिष्ठानतर्फे माजी सरपंच पोपटभाऊ विलास अपरंपार-पाटील यांच्या स्मरणार्थ भव्य नाईट टेनिस बॉल स्पर्धा पार पडल्या या स्पर्धांचे बक्षीस वितरण समारंभ कृषी व सहकारमंत्री डॉ. विश्वजित कदम व महेंद्र लाड यांच्या हस्ते पार पडले. या स्पर्धा तुपारी ग्रामपंचायतीच्या प्रांगणात पार पडल्या.
या स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे २१ हजारांचे पारिताेषिक व कायमस्वरूपी चषक विश्वजित स्पोर्ट्स चचेगाव यांनी जिंकले. द्वितीय क्रमांकाचे बक्षीस जेडीपी स्पोर्ट्स विटा तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस दोस्ती स्पोर्ट्स भवानीनगर यांनी पटकावले. अन्य उत्तेजनार्थ पारिताेषिकेही देण्यात आली. यावेळी ऋषिकेश लाड, माजी सरपंच दीपक पाटील, प्रकाश पाटील, उपसरपंच सुनील पाटील, भालचंद्र पाटील, भानुदास पाटील, माणिक पाटील, मधुकर पाटील, बाबूराव पाटील, ब्रह्मा विष्णू महेश पाटील, राजाराम मथळे, महेंद्र पाटील, झुंझार प्रतिष्ठानचे सदस्य कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.