करंजे सोसायटीच्या अध्यक्षपदी तुकाराम यादव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:21 IST2021-05-29T04:21:41+5:302021-05-29T04:21:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क विटा : करंजे (ता.खानापूर) येथील जय हनुमान सर्व सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी भीमराव सूर्यवंशी समर्थक गटाचे ...

Tukaram Yadav as the President of Karanje Society | करंजे सोसायटीच्या अध्यक्षपदी तुकाराम यादव

करंजे सोसायटीच्या अध्यक्षपदी तुकाराम यादव

लोकमत न्यूज नेटवर्क

विटा : करंजे (ता.खानापूर) येथील जय हनुमान सर्व सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी भीमराव सूर्यवंशी समर्थक गटाचे तुकाराम यादव यांची तर उपाध्यक्षपदी गोरख सूर्यवंशी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. करंजे येथील जय हनुमान विकास सोसायटीवर भीमराव सूर्यवंशी गटाची गेल्या ५० वर्षांपासून सत्ता अबाधित आहे. ही परंपरा आजही सुरू आहे.

करंजे येथील जय हनुमान विकास सोसायटीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड प्रक्रिया सहकार विभागाचे अधिकारी तथा निवडणूक अधिकारी अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी अध्यक्षपदी तुकाराम यादव तर उपाध्यक्षपदी गोरख सूर्यवंशी यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने, या दोघांची अनुक्रमे अध्यक्ष व उपाध्यक्ष पदावर बिनविरोध निवड झाली.

यावेळी गोपीनाथ सूर्यवंशी, प्रल्हाद माने, दाजी श्रावण लोंढे, संभाजी माने, सचिव शशिकांत घाडगे यांच्यासह सर्व संचालक व सभासद उपस्थित होते.

Web Title: Tukaram Yadav as the President of Karanje Society