शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: वीस वर्षांपासून बेपत्ता; नेपाळमध्ये सापडलेल्या वृद्धाला डोंगरसोनीत सोडले, रिहबिलिटेशन फाउंडेशनची माणुसकी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 13:02 IST

कुटुंबीयांना सुखद धक्का

तासगाव : वीस वर्षांपूर्वी मानसिक रुग्ण झालेल्या डोंगरसोनी (ता. तासगाव) येथील तुकाराम शिंदे ही व्यक्ती घरातून बेपत्ता झाली. तब्बल २० वर्षानंतर सोमवारी रिहबिलिटेशन फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी थेट डोंगरसोनीत आणून शिंदे यांच्या घरी त्यांच्या कुटुंबीयांना भेटवले. कुटुंबीयांना सुखद धक्का दिला. वीस वर्षांपूर्वी गावातून बेपत्ता झालेले शिंदे चक्क नेपाळमध्ये सापडले होते.तुकाराम शिंदे यांचा डोंगरसोनी गावात सलून व्यवसाय होता. त्यांना पत्नी आणि एक मुलगा आहे. सुमारे २० वर्षांपूर्वी त्यांना मानसिक आजार झाला होता. याच आजाराने ते गाव सोडून गेले. त्यांच्या कुटुंबीयांनी अनेक वर्ष शोध घेतला. मात्र कोठेच शोध लागला नाही. पोलिसांनीदेखील शोध घेण्याचा प्रयत्न केला. अखेर कुटुंबीयांनी शिंदे परत येतील, ही अशा सोडून दिली होती. मात्र अनपेक्षितपणे शिंदे यांच्या पत्नी आणि मुलाला सोमवारी शिंदे यांच्या घरी आगमन झाल्यामुळे सुखद धक्का बसला. मानसिकदृष्ट्या आजारी असणाऱ्या रुग्णांसाठी काम करणारे श्रद्धा रिहबिलिटेशन फाउंडेशन या संस्थेचे पदाधिकारी काही दिवसांपूर्वी नेपाळ येथील काही रुग्णांना सोडण्यासाठी नेपाळला गेले होते. यावेळी तेथे अशाच प्रकारे काम करणाऱ्या एका सामाजिक संस्थेत मराठी भाषिक असणारे शिंदे आढळून आले. त्यानंतर शिंदेंना घेऊन हे संस्थेचे पदाधिकारी मुंबई येथे आले.अधिक तपास केल्यानंतर शिंदे यांचे मूळ गाव डोंगरसोनी असल्याचे समजले. त्यानंतर संस्थेचे अजय रणमुरे आणि मनीषा भराडिया हे तुकाराम शिंदे यांना घेऊन थेट त्यांच्या घरी दाखल झाले.यावेळी माजी उपसरपंच किशोर कोडग, माजी पंचायत समिती सदस्य दिनकर झांबरे, रघुनाथ झांबरे सर्जेराव झांबरे त्यांचे कुटुंबीय यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीNepalनेपाळ