ओबीसींच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:26 IST2021-03-16T04:26:49+5:302021-03-16T04:26:49+5:30
सांगली जिल्हा ओबीसी समाज संघटनेतर्फे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांचा सत्कार करण्यात आला. शिष्टमंडळातर्फे विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदनही ...

ओबीसींच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील
सांगली जिल्हा ओबीसी समाज संघटनेतर्फे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांचा सत्कार करण्यात आला. शिष्टमंडळातर्फे विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदनही त्यांना देण्यात आले. ओबीसी कार्यकर्त्यांनी भेट घेऊन त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी पटोले यांनी ओबीसी बांधवांचे म्हणणे ऐकून घेऊन त्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची ग्वाही दिली.
यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील गुरव यांनी स्वागत केले. आरोग्य कर्मचारी संघटनेचे राज्याध्यक्ष अरूण खरमाटे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी दत्तात्रय घाडगे, शशिकांत गायकवाड आणि बाळासाहेब गुरव यांनी थोडक्यात प्रलंबित मागण्यांचा आढावा घेतला. कार्यक्रमास नंदकुमार निळकंठ, शरद झेंडे, धनपाल माळी, अर्चना सुतार, ॲड वसुधा कुंभार, डॉ. विवेक गुरव, दीपक सुतार, सागर गायकवाड, नंदकुमार कुंभार, दिनकर पतंगे, सुनीता मदने, रंजना माळी, एकनाथ सूर्यवंशी, लक्ष्मण देसाई आदी उपस्थित होते. अर्चना सुतार यांनी आभार मानले.