इस्लामपुरात बाल भवन उभारण्यासाठी प्रयत्न
By Admin | Updated: February 21, 2015 00:16 IST2015-02-20T23:43:00+5:302015-02-21T00:16:26+5:30
जयंत पाटील : बाल विकास मंच आणि स्वराज्य फौंडेशनतर्फे हस्तकला प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात

इस्लामपुरात बाल भवन उभारण्यासाठी प्रयत्न
इस्लामपूर : कलेच्या क्षेत्रात शहरी विद्यार्थ्यांबरोबर स्पर्धा करण्यासाठी ग्रामीण भागातील मुलांनाही बाल भवनसारखे कला दालन उभे करण्याचा प्रयत्न करु, अशी ग्वाही माजी ग्रामविकासमंत्री, आमदार जयंत पाटील यांनी गुरुवारी दिली.
इस्लामपूर येथे ‘लोकमत’ बाल विकास मंच आणि स्वराज्य फौंडेशनच्यावतीने माजी मंत्री आ. जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या ‘तारे जमीं पर’ या हस्तकला प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
मोठ्या गटातून आरती खैरे, तर लहान गटात तनुजा पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावले. व्ही. एस. नेर्लेकर प्राथमिक विद्यालय व इस्लामपूर हायस्कूलला उत्स्फूर्त सहभागासाठी मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी येथील कुसूमगंध उद्यानात या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शहरातील ९५0 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
राजारामबापू वस्त्रोद्योग संकुलाचे अध्यक्ष दिलीपराव पाटील, नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी, राजारामबापू बँकेचे अध्यक्ष प्रा. शामराव पाटील, उपनगराध्यक्ष संजय कोरे, नगरसेवक खंडेराव जाधव, शहाजी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यशाळेत लहान गटातील मुलांनी भेटकार्ड, शुभेच्छापत्रे, तर मोठ्या गटातील मुलांनी टिशू पेपरपासून पुष्पगुच्छ बनविले. कार्यक्रमस्थळी आ. जयंत पाटील यांच्या वाढदिवसाचा केक कापण्यात आल्यावर स्पर्धकांनी त्यांना शुभेच्छापत्रे व पेपरचे पुष्पगुच्छ देऊन अभीष्टचिंतन केले. श्रध्दा कुलकर्णी, जयप्रभा घोडके, ज्ञानेश्वर अनुसे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
दुधोंडी येथील छत्रपती शिवाजी विद्यालयाचे सिकंदर मोमीन यांनी कार्यशाळेतील मुलांना प्रशिक्षण दिले. यावेळी संगीता शहा, सायली शहा, कविता शहा यांनी मान्यवरांचे स्वागत केले. प्रतिभा शहा यांनी आभार मानले.
‘स्वराज्य’च्या सुमिता शहा, नेहा शहा, नैना शहा, पल्लवी शहा, प्रफुल्लता शहा, जैना शहा, रोझा किणीकर, संदेश शहा, भूषण शहा, अभय शहा, नितीन शहा व अरिहंत जैन, तसेच सोहाल गु्रपच्या सदस्यांनी संयोजन केले. (वार्ताहर)
मोठा गट अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय— बुके : आरती बबन खैरे (मालती कन्या), प्राची देसावळे (प्रकाश पब्लिक), साक्षी कुलकर्णी (इस्लामपूर हायस्कूल), प्रियांका पांढरपट्टे (उत्तेजनार्थ - इस्लामपूर हायस्कूल.)
लहान गट अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय— भेटकार्ड : तनुजा पाटील (विद्यामंदिर प्राथमिक विभाग), प्राप्ती आवटे (व्ही. एस. नेर्लेकर), धनश्री कुंडले (विद्यामंदिर), आदित्य पन्हाळकर (उत्तेजनार्थ, विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम).