कसबे डिग्रजवळ तिहेरी अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:42 IST2021-02-23T04:42:53+5:302021-02-23T04:42:53+5:30

कसबे डिग्रज : पेठ-सांगली मार्गावर कसबे डिग्रजजवळ सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास झालेल्या तिहेरी अपघातामध्ये चारचाकीचे मोठे नुकसान झाले. मोटारीचा ...

Triple accident near Kasbe degree | कसबे डिग्रजवळ तिहेरी अपघात

कसबे डिग्रजवळ तिहेरी अपघात

कसबे डिग्रज : पेठ-सांगली मार्गावर कसबे डिग्रजजवळ सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास झालेल्या तिहेरी अपघातामध्ये चारचाकीचे मोठे नुकसान झाले. मोटारीचा चालक बचावला. चारचाकीचा पूर्ण चेंदामेंदा झाला. अपघातामुळे वाहतूक विस्कळीत झाल्याने एकेरी वाहतूक करण्यात आली होती.

सांगलीहून स्वारगेटला जाणारी शिवशाही बस (क्र. एमएच ०९ इएम ९९४०) तसेच तिच्यामागून निघालेली चारचाकी (एमएच १० बीएम १७९२) कसबे डिग्रज फाट्यानजीक आल्यानंतर मिरजहून साताऱ्याला इंधन भरून निघालेल्या टँकरने (क्र. एमएच ११ बीएल ५८५९) नियंत्रण सुटल्याने चारचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. त्यामुळे चारचाकी शिवशाही बसवर आदळली. यामध्ये दोन्ही वाहनांच्या मध्ये सापडल्याने चारचाकी गाडी पूर्णतः दुमडली गेली.

चारचाकीचे मोठे, तर शिवशाही आणि टँकरचे किरकोळ नुकसान झाले. चालक बचावला. अपघाताची नोंद ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Web Title: Triple accident near Kasbe degree