शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवा कुर्ता, भगवा टिळा आणि..., सुवेंदू अधिकारी यांनी घेतली बंगालच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
2
भारत-पाकिस्तानमध्ये पडद्याआड चर्चा? गेल्या तीन महिन्यात दोन बैठका, समोर येतेय अशी माहिती
3
महागड्या Personal Loan ला विसरा; PPF खात्यावर मिळवू शकता स्वस्त कर्ज, जाणून घ्या नियम
4
प्रेम विवाहाला ३ महिने पूर्ण होण्याआधीच मोनिकाचा संशयास्पद मृत्यू; जळत्या चितेतून पोलिसांनी बाहेर काढला मृतदेह
5
Tamil Nadu Govt Formation: विजय यांच्या पक्षाने राज्यपालांना दिलं पाठिंब्याचं खोटं पत्र, या नेत्याने घेतली पोलिसांत धाव   
6
पंतप्रधान मोदींचा करिष्मा अन् अमित शाहांची चाणक्यनीती पश्चिम बंगालमध्ये यशस्वी- एकनाथ शिंदे
7
सामुद्रिक शास्त्र : डोळा लवणे शुभ की अशुभ? स्त्री आणि पुरुषांसाठी काय आहेत याचे वेगवेगळे अर्थ!
8
युझवेंद्र चहल ई-सिगारेट पिताना दिसला, पण कारवाई मात्र अर्शदीप सिंगवर होणार? जाणून घ्या प्रकरण
9
"६००० कोटींची शासकीय जमीन खासगी बिल्डर्सच्या घशात घालण्याचा महायुतीचा डाव"; काँग्रेसचा आरोप
10
पेट्रोल पंपांवर मोफत मिळतात 'या' ६ सुविधा; पैसे मागितले तर करू शकता तक्रार, जाणून घ्या तुमचा अधिकार
11
Nashik TCS Case: निदा खानचा हैदराबादला पळण्याचा प्लॅन कसा फसला? एआयएमआयएम नेत्याचा मोबाईल सापडला अन्...
12
Astrology: तुमचा जन्म सकाळचा की रात्रीचा? जन्मवेळ सांगते तुमच्या स्वभावाचे विशिष्ट पैलू!
13
घरबसल्या दरमहा कमवू शकता २० हजार रुपये; जाणून घ्या Post Officeच्या या सुपरहिट योजनेचं गणित
14
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
15
एज व्हेरिफिकेशन करताना इंटरनेट कंपन्यांच्या नाकी नऊ; खोट्या दाढी-मिशा लावून मुलं करतायत सिस्टिमची फसवणूक!
16
‘मुलीच्या डोक्यावर केस कमी आहेत...’ सांगत साखरपुडा मोडला, 'खरं' कारण कळताच सगळ्यांचा संताप झाला!
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीत अमेरिका-इराण भिडले! युद्धविराम धुडकावून गोळीबार; हल्ल्यामुळे जहाजाला लागली आग
18
भारताचा दणका अन् चीनचा खोटारडेपणा! १ वर्षानंतर चीनने जगासमोर मान्य केलं ऑपरेशन सिंदूरमधील 'ते' सत्य
19
पुन्हा उधारीच्या भरवशावर पाकिस्तान! IMF कडून १.३२ बिलियन डॉलर्सची मदत; पण जनतेचे कंबरडे मोडणार?
20
लेफ्टिनेंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी देशाचे नवे CDS, अशी आहे त्यांची कारकीर्द 
Daily Top 2Weekly Top 5

कृषी बाजार समितीचे त्रिभाजन करा

By admin | Updated: November 28, 2014 23:45 IST

मनोहर सारडा : ...अन्यथा एलबीटीविरोधात पुन्हा आंदोलन करणार

सांगली : जत, कवठेमहांकाळ बाजार समित्या आता सक्षम झाल्या असून, सांगली उत्पन्न बाजार समिती आता वेगळी करुन त्याचे त्रिभाजन करण्यात यावे, अशी मागणी चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्य्
ाक्ष मनोहर सारडा यांनी आज (शुक्रवार) येथे पत्रकार परिषदेत केली. राज्य शासनाने एलबीटी डिसेंबरअखेर हटवावा, अन्यथा पुन्हा एकदा आंदोलन उभारण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला.
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मिरज, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यांचा समावेश आहे. जत आणि कवठेमहांकाळ समित्या आता आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्या आहेत. त्यामुळे मिरज तालुक्यासाठीची बाजार समिती वेगळी करण्यात यावी. सांगली उत्पन्न बाजार समितीमध्ये आता गोळा होणाऱ्या सेसमध्ये सुमारे ८५ टक्के वाटा हा मिरज तालुक्याचा आहे. त्यामुळे हा निधी आमच्या ठिकाणीच खर्च करण्यात यावा अशी आमची मागणी आहे. मिरज तालुक्यामध्ये अनेक व्यापारी, शेतकऱ्यांच्या समस्या आहेत. त्या मिटल्या पाहिजेत. मोठ्या क्षमतेच्या गोदामाची, कोल्ड स्टोअरेजची गरज आहे. हळद ठेवण्यासाठी जागा नसल्यामुळे हजारो पोती हळद खराब झाली आहे. याकडे आता लक्ष दिले पाहिजे. या सर्व मागण्यांचे निवेदन आम्ही सहकरामंत्री चंद्रकांत पाटील यांना देणार आहोत. कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक आल्यापासून अनेक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. रस्ते, वीजसह नागरी सुविधा उपलब्ध होत आहे. राजकारणविरहीत विकास कामे झाली आहेत. पुढील कामासाठी निधीची गरज आहे. शेतकरी भवन उभारणी, बगीचा, पार्किंग व्यवस्था, वॉचमनची संख्या वाढवावी याचीही मागणी आम्ही सहकारमंत्र्याकडे करणार आहोत.
एलबीटी हा कोणत्याही परिस्थितीत विनापर्याय हटवला पाहिजे. भाजप सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेले वचन पाळले पाहिजे. करप्रणाली सुटसुटीत हवी. येत्या डिसेंबरअखेर एलबीटी कर हटविला पाहिजे. अन्यथा व्यापारी शिखर परिषदेच्या माध्यमातून पुन्हा एकदा आंदोलन उभे करण्यात येईल, असा इशाराही यावेळी त्यांनी दिला. (प्रतिनिधी)


चार व्यापारी प्रतिनिधी द्या
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या दोन व्यापाऱ्यांना संचालक म्हणून प्रतिनिधीत्व देण्यात आले आहे. व्यापाराची व्याप्ती पाहता ही संख्या चार करण्यात यावी. यामुळे व्यापारी व शेतकऱ्यांचे योग्य पध्दतीने प्रतिनिधीत्व होईल, अशी मागणीही यावेळी सारडा यांनी केली.