इस्लामपुरात महिला राष्ट्रवादीकडून वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:17 IST2021-07-03T04:17:41+5:302021-07-03T04:17:41+5:30

तुकाईखडी येथे वृक्षारोपण करून रोपे जगविण्याची शपथ घेताना रोझा किणीकर, पुष्पलता खरात, शैलजा जाधव, सुवर्णा जगताप, मनीषा पेठकर आदींसह ...

Tree planting by women nationalists in Islampur | इस्लामपुरात महिला राष्ट्रवादीकडून वृक्षारोपण

इस्लामपुरात महिला राष्ट्रवादीकडून वृक्षारोपण

तुकाईखडी येथे वृक्षारोपण करून रोपे जगविण्याची शपथ घेताना रोझा किणीकर, पुष्पलता खरात, शैलजा जाधव, सुवर्णा जगताप, मनीषा पेठकर आदींसह महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या, संसदरत्न खा. सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसानिमित्त वाळवा तालुका महिला राष्ट्रवादी व इस्लामपूर शहर महिला राष्ट्रवादीच्या वतीने इस्लामपूर पोलीस परेड ग्राऊंड तसेच तुकाईखडी येथे वृक्षारोपण करण्यात आले.

जिल्हाध्यक्ष सुस्मिता जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका महिला राष्ट्रवादीने इस्लामपूर येथील पोलीस परेड ग्राऊंडशेजारी वृक्षारोपण केले. यावेळी महिला पोलीस अधिकाऱ्यांसह कमल पाटील, मेघा पाटील, सुनीता देशमाने, अलका माने, नयना पाटील आदी उपास्थित होत्या.

शहराध्यक्षा रोझा किणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर महिला राष्ट्रवादीने तुकाईखडी येथे वृक्षारोपण केले. यावेळी महिलांनी या रोपांची वाढ करण्याची शपथही घेतली. शैलजा जाधव, पुष्पलता खरात, सुवर्णा जगताप, मनीषा पेठकर, मंदाकिनी चव्हाण, योगिता जाधव, योजना कोळेकर, गीता पाटील, सुनंदा साठे, प्रतिभा पाटील उपस्थित होत्या.

Web Title: Tree planting by women nationalists in Islampur