विटा येथे महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वृक्षारोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:19 IST2021-07-01T04:19:35+5:302021-07-01T04:19:35+5:30
विटा : खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विटा येथे शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नगराध्यक्षा प्रतिभा पाटील ...

विटा येथे महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने वृक्षारोपण
विटा : खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विटा येथे शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नगराध्यक्षा प्रतिभा पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या विटा शहराध्यक्षा लता मेटकरी म्हणाल्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र महिला प्रतिनिधी खासदार सुप्रिया सुळे यांच्या सूचनेनुसार वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देऊन विविध प्रकारच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. विटा शहरातील आम्ही सर्व महिला कार्यकर्त्यांनी मिळून वृक्षारोपणाने सुळे यांचा वाढदिवस साजरा केला.
यावेळी जिल्हा कार्यकारिणी सदस्या रंजना पवार, युवती तालुकाध्यक्षा पूनम महापुरे, संगीता भोसले, रूपाली म्हेत्रे, अदिती ठाकूर, प्रतीक्षा तावरे, आरती साठे, जयमाला मनगुत्ते, अंजली चिरमे, सुनीता पवार, रेखा पवार, सविता कवडे, शशिकला भोसले, सुजाता निकम, अर्चना कुलकर्णी, प्रतिभा काटकर, सुनीता घोडके, दीपाली वरुडे, संध्या कांबळे, कल्पना कांबळे, वृषाली निवळे यांच्यासह महिला उपस्थित होत्या.
फोटो : ३० विटा १
ओळ : विटा येथे खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विटा शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने नगराध्यक्षा प्रतिभा पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.