आयकर विभागातर्फे अग्रण धुळगाव येथे वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:28 IST2021-09-21T04:28:29+5:302021-09-21T04:28:29+5:30

अग्रण धुळगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे आयकर विभागातर्फे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपवनसंरक्षक विजय माने, आयकर आयुक्त विठ्ठल सरगर आदी ...

Tree planting at Agran Dhulgaon by Income Tax Department | आयकर विभागातर्फे अग्रण धुळगाव येथे वृक्षारोपण

आयकर विभागातर्फे अग्रण धुळगाव येथे वृक्षारोपण

अग्रण धुळगाव (ता. कवठेमहांकाळ) येथे आयकर विभागातर्फे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी उपवनसंरक्षक विजय माने, आयकर आयुक्त विठ्ठल सरगर आदी उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

कवठेमहांकाळ : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सांगली आयकर विभागातर्फे अग्रण धुळगाव (ता. कवठेमंकाळ) येथे वृक्षारोपण करण्यात आले. सह्याद्री देवराई अग्रणी जैवविविधता उद्यान प्रकल्पामध्ये २०० झाडे लावण्यात आली. यावेळी उपवन संरक्षक विजय माने, आयकर विभागाचे अतिरिक्त आयुक्त विठ्ठल सरगर, अजय पवार, विजय संघवी, उदय जोशी, मंगेश पंडित, शैलेश भोसले, वन विभागाचे दत्तात्रय भोसले आदी उपस्थित होते.

यावेळी सरगर म्हणाले, सह्याद्री देवराई अग्रणी प्रकल्पांतर्गत जैवविविधता उद्यान राज्यातील आदर्श बनविणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. त्यासाठी वृक्षांच्या संगोपनासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करायला हवेत. यावेळी ग्रामपंचायत आणि अग्रणी पाणी फाऊंडेशनतर्फे सर्वांना वृक्षभेट देण्यात आली. यावेळी अर्जुन भोसले, शिवदास भोसले, अरविंद भोसले, कमलाकर देशमुख, वसंत भोसले, अतुल शेषवरे, अजय कदम, अमीर शेख, समीर शेख आदी उपस्थित होते.

Web Title: Tree planting at Agran Dhulgaon by Income Tax Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.