पाडळी-विटा बस सुरू करण्याची प्रवासाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:22 IST2021-01-02T04:22:36+5:302021-01-02T04:22:36+5:30
वांगी : कोरोनाचे संकट काहीअंशी दूर झाले असून, शासनाने जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी बससेवा सुरू करण्याचे निर्देश दिले ...

पाडळी-विटा बस सुरू करण्याची प्रवासाची मागणी
वांगी : कोरोनाचे संकट काहीअंशी दूर झाले असून, शासनाने जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी बससेवा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र बऱ्याच ग्रामपंचायतीने व विद्यार्थ्यांनी अनेक वेळा मागणी करूनही पाडळी-विटा ही बस अद्याप सुरू झाली नाही. तरी ही बस तत्काळ सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
पाडळी-विटा ही बस बऱ्याच वर्षांपासून शासकीय कर्मचारी व विद्यार्थी यांच्यासाठी उपयुक्त होती. लॉकडाऊनमध्ये ही बस बंद झाली. शासनाने बससेवा सुरू करण्याच्या आदेशानंतर ही बस सुरू झाली नाही. त्यामुळे शासकीय कर्मचारी, महिलांना कामावर जाण्यासाठी व विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी मोठी गैरसोय होत आहे. यासाठी संबंधित ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी बस सुरू करण्याची वेळोवेळी मागणी करूनही बस सुरू झाली नाही. तरी विटा आगारप्रमुखानी प्रवासाची होणारी गैरसोय समजून घेऊनही बस तातडीने सुरू करावी, अशी मागणी होत आहे.