शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
5
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
6
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
7
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
8
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
9
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
10
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
11
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
12
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
13
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
14
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
15
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
16
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
17
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
18
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
19
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
20
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 

डांबरामध्ये अडकलेल्या नागास शिराळकरांनी दिले जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 7:03 PM

snake Sangli-शिराळकर स्वतःचा जीव धोक्यात घालून नागाचा प्राण वाचवतात, असे अनेक प्रसंग घडले आहेत. असाच प्रसंग शिराळा येथे आज शनिवार रोजी दुपारी बाराचे दरम्यान घडला. डांबरामध्ये अडकलेल्या नागास तीन तासाच्या प्रयत्नाने शिराळकरांनी जीवदान देऊन पुन्हा नागावरील प्रेम आणि श्रद्धा किती आहे हे दाखवून दिले आहे.

ठळक मुद्दे डांबरामध्ये अडकलेल्या नागास शिराळकरांनी दिले जीवदान शिराळकरांचे तीन तास प्रयत्न

विकास शहाशिराळा : शिराळकर स्वतःचा जीव धोक्यात घालून नागाचा प्राण वाचवतात, असे अनेक प्रसंग घडले आहेत. असाच प्रसंग शिराळा येथे आज शनिवार रोजी दुपारी बाराचे दरम्यान घडला. डांबरामध्ये अडकलेल्या नागास तीन तासाच्या प्रयत्नाने शिराळकरांनी जीवदान देऊन पुन्हा नागावरील प्रेम आणि श्रद्धा किती आहे हे दाखवून दिले आहे.येथील नाथ मंदिराजवळील संजय जाधव यांच्या शेतातील शेड जवळ डांबराच्या ब्यारेलमध्ये हा नाग पडला होता. हा नाग या ब्यारेलमध्ये उन्हाने पातळ झालेल्या डांबरामध्ये अडकून पडला होता. त्यास काहीही हालचाल करता येत नव्हती. याबाबत माहिती कळताच प्रा. सुशीलकुमार गायकवाड , संतोष गायकवाड, निलेश गायकवाड, सचिन जाधव, विजय जाधव, रोहन म्हेत्रे, संजय मंगलेकर, ऋतुराज जाधव हे त्याठिकाणी पोहोचले.यावेळी नागाची अवस्था गंभीर होती. याबाबत माहिती वनक्षेत्रपाल सुशांत काळे यांना दिली. उन्हामुळे गरम झालेल्या डांबरामध्ये नागाला चटके बसत होते. तातडीने या सर्व नाग प्रेमींनी डिझेल, खाद्यतेल आणले. जवळजवळ अडीच तास डिझेलने नागाला धुतले तसेच गोडेतेल आदीने साफ करत नागाला डांबर मधून बाहेर काढले.डांबर मधून स्वच्छ केलेल्या या नागास पशुवैद्यकीय अधिकारी यांचेकडे तपासणीसाठी नेण्यात आले. यावेळी त्याच्यावर उपचार करून या नागास वनविभागाच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. नाग पूर्ण बरा झाल्यावर त्यास नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.शिराळकरानी या अगोदर नांगरट करताना नांगरात अडकून जखमी झालेले, बोअर-विहिरीत मध्ये अडकलेले, वाहनांच्या धडकेत जखमी झालेले, कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेले अश्या अनेक नागांचे प्राण वाचवले आहेत. इतर कोणत्याही ठिकाणी सर्प पहिला की त्यास मारले जाते, मात्र शिराळा येथे सर्प तसेच नागाचा जीव वाचवला जातो. अगदी वेळप्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यामुळे शिराळकरच खरे सर्पमित्र, सर्पप्रेमी म्हणावे लागेल.

नाग पुढील उपचारासाठी वनविभागाच्या निगराणीखालीशिराळामधील प्रा. सुशीलकुमार गायकवाड यांच्यासह नागप्रेमींनी अनेक नागाला जीवदान दिले आहे. पुढील उपचारासाठी वनविभागाच्या निगराणी खाली ठेवले आहे.तो पूर्ण बरा झाल्यावर नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल. नागरिकांनी असे जखमी साप, प्राणी, पक्षी आढळल्यास लगेच वनविभागाला कळवावे, असे आवाहन वनक्षेत्रपाल सुशांत काळे यांनी केले आहे

टॅग्स :snakeसापshirala-acशिराळाSangliसांगलीwildlifeवन्यजीव