पोेलिस अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या

By Admin | Updated: July 18, 2016 00:47 IST2016-07-18T00:40:15+5:302016-07-18T00:47:54+5:30

मोहिते जतला : पुजारी आटपाडीला

Transfers under the District of Polis Officials | पोेलिस अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या

पोेलिस अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या

सांगली : जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी शनिवारी जिल्हा पोलिस दलातील अधिकाऱ्यांचे पुन्हा खांदेपालट केले. त्यांनी तीन पोलिस निरीक्षक व तीन उपनिरीक्षक अशा सहा अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या केल्या आहेत.
गुप्त वार्ता विभागाचे युवराज मोहिते यांची जत पोलिस ठाण्यात, जतचे कल्लाप्पा पुजारी यांची आटपाडीला, पोलिस मुख्यालयातील नियंत्रण कक्षातील अशोक कदम यांची आष्टा पोलिस ठाण्यात, बदली केली असून, आष्ट्याचे प्रताप पोमण यांच्याकडे शिराळा पोलिस ठाण्याची जबाबदारी सोपविली आहे. याशिवाय कुपवाड पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक बाळासाहेब गोसावी यांची मिरज शहरला, तर नियंत्रण कक्षातील संतोष इंगळे यांची आटपाडी पोलिस ठाण्यात बदली केली आहे. बदली झालेल्या अधिकाऱ्यांना तातडीने हजर होण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या तीन महिन्यांत तीनवेळा अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या झाल्या आहेत. (प्रतिनिधी)
 

Web Title: Transfers under the District of Polis Officials