उपमुख्य कार्यकार्‍यांसह तीन बीडीओंच्या बदल्या

By Admin | Updated: June 1, 2014 01:14 IST2014-06-01T01:12:07+5:302014-06-01T01:14:21+5:30

जिल्हा परिषद : कडेगाव बीडीओपद रिक्त

Transfers of three BDs with Deputy Chief Executive | उपमुख्य कार्यकार्‍यांसह तीन बीडीओंच्या बदल्या

उपमुख्य कार्यकार्‍यांसह तीन बीडीओंच्या बदल्या

सांगली : जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाकडील उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस. डी. मुंडे यांच्यासह जिल्ह्यातील चार अधिकार्‍यांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या झाल्या. नव्याने तीन अधिकारी दाखल झाले असून, कडेगाव पंचायत समितीकडील गटविकास अधिकारीपद रिक्त राहिले आहे. विनंती बदलीसाठी शासनाकडे गेल्या दोन वर्षापासून अर्ज करून मुंडे यांनी पुणे येथे बदली मागितली होती. परंतु, शासनाने त्यांची नियुक्ती कोल्हापूरच्या ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रावर प्राचार्यपदी केली. गैरसोयीच्या बदलीवर ते नाराज आहेत. त्यांच्या रिक्त पदावर विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे येथील सहाय्यक आयुक्त व्ही. व्ही. बगाडे यांची नियुक्ती झाली आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी एम. आर. जाधव सेवानिवृत्त झाले आहेत. या रिक्त पदावर सातारा जिल्हा परिषदेकडील सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस. एस. मस्कर यांची नियुक्ती झाली आहे. खानापूरचे गटविकास अधिकारी ए. आर. पाटील यांची कºहाड पंचायत समितीकडे त्याच पदावर बदली झाली आहे. येथील रिक्त पदावर कºहाडचे गटविकास अधिकारी एस. एच. पवार यांची नियुक्ती झाली. कडेगावचे गटविकास अधिकारी एस. डी. जोशी यांची आष्टी (जि. बीड) येथे बदली झाली असून, येथील पद रिक्त आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Transfers of three BDs with Deputy Chief Executive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.