जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:32 IST2021-08-17T04:32:35+5:302021-08-17T04:32:35+5:30
मिरजेचे निरीक्षक राजू तशिलदार यांची कोल्हापूरला बदली करण्यात आली. त्यांच्या जागी निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांची नियुक्ती केली आहे. सांगलीचे ...

जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
मिरजेचे निरीक्षक राजू तशिलदार यांची कोल्हापूरला बदली करण्यात आली. त्यांच्या जागी निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांची नियुक्ती केली आहे. सांगलीचे मिलिंद पाटील यांची सोलापूर ग्रामीण, आप्पासाहेब कोळी, रवींद्र शेळके यांची कोल्हापूर तर रामदास शेळके यांची सोलापूर ग्रामीणला बदली झाली. सोलापूर ग्रामीणचे रवींद्र डोंगरे यांची पुन्हा सांगलीला बदली करण्यात आली आहे तर साताराचे आप्पासाहेब मांजरे यांचीही सांगलीला बदली झाली आहे. पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट यांची नागपूर शहरला. जतचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपाळ भोसले यांची मुंबई शहर, पलूसचे पोलीसचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास जाधव यांची कोल्हापूर परिक्षेत्र, एटीएस पथकचे उपनिरीक्षक गणेश शिंदे यांची औरंगाबाद परिक्षेत्र बदली करण्यात आली आहे.
रत्नागिरीचे रोहन दणाणे, पुणे शहरचे विठ्ठल माने, लाचलुचपतचे सहाय्यक निरीक्षक आरिफा मुल्ला यांची तुर्ची पोलीस प्रशिक्षण केंद्रात बदली झाली आहे. नाशिकचे सहाय्यक निरीक्षक रोहिदास गभाळे, गुन्हे अन्वेषणचे विकास पाडळे, दहशतवादी विरोधी पथकाचे निरीक्षक राजेश रामाघरे यांची सांगलीला बदली झाली आहे.