जिल्ह्यातील १३ उपनिरीक्षकांच्या बदल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:32 IST2021-08-25T04:32:01+5:302021-08-25T04:32:01+5:30

सांगली : जिल्ह्यातील १३ उपनिरीक्षकांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या करण्यात आल्या, तर नवे ११ सहायक निरीक्षक जिल्ह्यात रुजू झाले आहेत. तीन ...

Transfers of 13 sub-inspectors in the district | जिल्ह्यातील १३ उपनिरीक्षकांच्या बदल्या

जिल्ह्यातील १३ उपनिरीक्षकांच्या बदल्या

सांगली : जिल्ह्यातील १३ उपनिरीक्षकांच्या जिल्ह्याबाहेर बदल्या करण्यात आल्या, तर नवे ११ सहायक निरीक्षक जिल्ह्यात रुजू झाले आहेत. तीन उपनिरीक्षकांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी बदल्यांचे आदेश रात्री उशिरा जारी केले.

कोल्हापूर परिक्षेत्रात २४ सहायक निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जारी झाले. त्यात अकरा सहायक निरीक्षक सांगली जिल्ह्यात आले. अधिकाऱ्यांची नावे अशी : (कंसात पूर्वीची नियुक्ती) विकास जाधव, बजरंग झेंडे, विशाखा झेंडे (दोघे ठाणे शहर), अविनाश पाटील (रायगड), रोहित दिवसे (सोलापूर), धनाजी पाटील (राज्य गुन्हे विभाग), युवराज सरनोबत (कोल्हापूर), प्रदीप शिंदे (पुणे), प्रशांत चव्हाण (मुंबई), तानाजी कुंभार (मुंबई), अण्णासाहेब बाबर (सिंधुदुर्ग).

पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्यांचेही आदेश जारी झाले. त्यात सागर ढाकणे (पुणे ग्रामीण), प्रकाश कांबळे (कोल्हापूर), समीर कदम (सातारा), संजय कपडेकर (सोलापूर ग्रामीण), राजेंद्र सोनवणे (पुणे ग्रामीण), अल्लाबक्ष सय्यद (सोलापूर ग्रामीण), उमेश चिकणे, युवराज घोडके (पुणे ग्रामीण) यांची बदली बाहेर झाली. परिक्षेत्रातील २१ जणांचा कालावधी पूर्ण झाला होता. त्यापैकी जिल्ह्यातील तिघांना वर्षाची मुदतवाढ देण्यात आली. सुहास गंगधर, इसाक चौगुले, राजेंद्र यादव यांचा त्यात समावेश आहे. विष्णू माळी (कोल्हापूर), विजयसिंह घाडगे (कोल्हापूर), अभिजित सावंत (पुणे ग्रामीण), गणेश पाटील (पुणे ग्रामीण), दीपाली गायकवाड (कोल्हापूर) यांची सांगली जिल्ह्यात बदली करण्यात आली.

Web Title: Transfers of 13 sub-inspectors in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.