शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

कोल्हापुरातून मराठवाड्याकडे रेल्वे धावताहेत ओव्हरफुल्ल, उन्हाळी सुट्ट्यांसाठी अतिरिक्त गाड्यांची मागणी 

By संतोष भिसे | Updated: April 11, 2023 18:52 IST

कोल्हापूर - गोंदीया महाराष्ट्र एक्सप्रेस तर बाराही महिने फुल्ल

सांगली : कोल्हापुरातून सुटणाऱ्या मराठवाड्यात जाणाऱ्या सर्व एक्सप्रेस रेल्वे क्षमतेपेक्षा अधिक भरुन धावत आहेत. तरीही या मार्गावर पुरेशा गाड्या सोडण्याचे सौजन्य रेल्वेने दाखवलेले नाही. सन २०२२ या वर्षातील प्रवासी वाहतुकीची माहिती रेल्वेने दिली, त्यानुसार सर्वच गाड्या अक्षरश: ओव्हरफुल्ल धावत असल्याचे स्पष्ट झाले आहे.मराठवाड्यातून धावणाऱ्या रेल्वेगाड्या ओव्हरलोड असल्याने प्रवाशांसाठी उन्हाळी विशेष व नवीन रेल्वेगाड्या सोडण्याची मागणी होत आहे. पण त्याकडे प्रशासनाने लक्ष दिलेले नाही. कोल्हापुरातून महाराष्ट्र एक्सप्रेस आणि कोल्हापूर - नागपूर द्विसाप्ताहिक एक्सप्रेस मराठवाड्यात धावते. शिवाय मिरजेतून परळी पॅसेंजर दररोज धावते. दररोज धावणारी मिरज - कलबुर्गी एक्सप्रेस काही अंशी मराठवाड्याच्या सीमेवरुन जाते. या सर्वच गाड्या सदोदीत फुल्ल असतात. कोल्हापूर - गोंदीया महाराष्ट्र एक्सप्रेस तर बाराही महिने फुल्ल असते.पश्चिम महाराष्ट्रातून मराठवाड्यात जाण्यासाठी या मोजक्याच गाड्या असल्याने प्रवाशांना वेटिंगवर रहावे लागते. शिवाय आरक्षण न मिळाल्याने खासगी ट्रॅव्हल्स गाडीने नागपूर, औरंगाबादला जाणाऱ्या प्रवाशांची संख्याही मोठी आहे. प्रवाशांची गर्दी पाहता या मार्गावर आणखी काही गाड्या सोडण्याची गरज आहे.सन २०२२ मधील आकडेवारीनुसार कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस कमाईमध्ये फायद्याची ठरली आहे. तिने १० महिन्यांत २८४ फेऱ्यांतून एक कोटी ३९ हजार ४० रुपये मिळवून दिले. प्रत्येकी फेरीतून सरासरी ३५ हजार ३४९ रुपये उत्पन्न मिळाले. या गाडीतून पुण्यासह शेगाव व नागपूरला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. मराठवाड्यातील अनेक तरुण पश्चिम महाराष्ट्रात काम व शिक्षणासाठी राहत असल्याने त्यांच्यासाठीही अतिरिक्त गाड्यांची गरज आहे.कोल्हापुरातून मराठवाड्यातील गाड्या ओव्हरफुल्लसन २०२२ या वर्षभरात गाडी क्रमांक ११४०३ नागपूर - कोल्हापूर एक्सप्रेस १८६.३७ टक्के भरुन धावली. गाडी क्रमांक ११४०४ कोल्हापूर - नागपूर एक्सप्रेसने १५७.७३ टक्के प्रवासी वाहतूक केली. शिवाय गाडी क्रमांक ११०४५ कोल्हापूर - धनबाद एक्सप्रेस हीदेखील १८६.५७ टक्के क्षमतेने धावल्याची माहिती रेल्वेने दिली.

टॅग्स :Sangliसांगलीrailwayरेल्वे