रेल्वे प्रवाशांना वाटते, कोरोना संपला, स्थानकात मास्क, डब्यात बेफिकिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:31 IST2021-09-17T04:31:10+5:302021-09-17T04:31:10+5:30
रिॲलिटी चेक फोटो १६ संतोष ०२ सांगलीत रेल्वेत चढणाऱ्या प्रवासांना मास्कचे भानच नसते. लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : लॉकडाऊन ...

रेल्वे प्रवाशांना वाटते, कोरोना संपला, स्थानकात मास्क, डब्यात बेफिकिरी
रिॲलिटी चेक
फोटो १६ संतोष ०२
सांगलीत रेल्वेत चढणाऱ्या प्रवासांना मास्कचे भानच नसते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर, त्यानुसार रेल्वेंना गर्दी वाढत असल्याचे दिसत आहे. कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असल्याने प्रवासी बेफिकीर बनत असल्याचेही दिसत आहे. कोरोनाच्या नियमांना डावलून विनामास्क गर्दी केली जात आहे.
सध्या फक्त एक्स्प्रेस गाड्याच धावत आहेत. पॅसेंजर बंद असल्याने एक्स्प्रेस गाड्यांना गर्दी होत आहे. स्थानकात प्रवाशांना मास्कची सक्ती आहे, गाडीत बसल्यानंतर मात्र ते बेफिकीर होत असल्याचे दिसत आहे. गाड्यांना गर्दी तर आहेच, शिवाय कोरोनाकडेही दुर्लक्ष केले जात आहे. रेल्वे सुरक्षा बलाचे जवान आणि तिकीट तपासणीस येतात, तेव्हाच मास्क नाकावर चढवला जातो. विशेष म्हणजे, रेल्वेतील खाद्यपदार्थ विक्रेतेदेखील कोरोना नियमांना धाब्यावर बसवत असल्याचेही दिसत आहे.
बॉक्स
विक्रेते बेफिकीर
मिरजेतून पुणे व बंगलुरू मार्गावर सध्या सर्वाधिक एक्स्प्रेस धावत आहेत. त्यामध्ये विक्रेत्यांची वर्दळही वाढली आहे. त्यांच्याकडून कोरोना नियमांचे पालन होताना दिसत नाही. मास्क नाकावर नसतात, शिवाय स्वच्छताही पाळली जात नाही.
बॉक्स
सर्रास गाड्यांत अशीच स्थिती
- यशवंतपूर-अजमेर एक्स्प्रेस, मिरज-यशवंतपूर राणी चेन्नम्मा एक्स्प्रेसमध्ये आदी बारा एक्स्प्रेस सध्या धावत आहेत.
- सर्वच एक्स्प्रेसमध्ये कोरोनाविषयक एकसारखी अवस्था आहे. प्रवासी काळजी न घेताच गर्दी करत असल्याचे दिसते.
- विशेषत: एकाच कुटुंबातील प्रवासी असतील तर कोरोनाचे नियम उल्लंघनाचे प्रमाण जास्त आहे.
कोट
रेल्वेला गर्दी असली तरी कोरोनाविषयक काळजी घेतली जात आहे. स्थानकांवर सॅनिटायजर, सोशल डिस्टन्सिंग व मास्क सक्तीचा आहे. प्रवाशांनीही काळजी घ्यावी. विविध राज्यांत कोरोनाविषयक चाचण्या व लसीकरणाचे नियम आहेत, त्याचीही नोंद प्रवाशांनी घ्यावी.
मनोज झंवर, जनसंपर्क अधिकारी