शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

रक्षकच बनला भक्षक! सांगलीत पोलिस कृपेने बांगलादेशी तरुणींची तस्करी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 17:33 IST

खाकीचा गैरवापर करत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार

सांगली : शहरातील विश्रामबाग पोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचारी स्वप्नील कोळी याने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला. पोलिस दलातील अन्य कर्मचारी उल्लेखनीय कामगिरी करत असताना, काेळीच्या कारनाम्याने खाकीवर डाग लागला आहे. दरम्यान, सांगलीत बांगलादेशी तरुणींचा वेश्या व्यवसायातील वापराचा मुद्दा चर्चेत आला आहे. रक्षणाची जबाबदारी असलेल्या पोलिसानेच अत्याचार केल्याने या तरुणींची पिळवणूकही समोर आली आहे.अल्पवयीन मुलीवर अन्याय आणि वाचा...

  • शहरातील एका उपनगरात राहणाऱ्या पीडितेच्या घरात घुसून जानेवारी २०२२ मध्ये स्वप्नील कोळी याने अत्याचार केला होता. यानंतरही त्याने पीडितेकडून व अन्य महिलेकडून प्रारंभी दोन लाख व पाच लाख असे सात लाख रुपयांची खंडणी वसूल केली होती.
  • वर्षभरापासून पीडितेवरील अन्यायाविरोधात पाठपुरावा करण्यात येत होता. अखेर कोळीवर गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली.

अधिकाऱ्यांची ठाम भूमिका अन् कारवाईअल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिच्याकडूनच खंडणी वसूल करणाऱ्या कोळीवरील कारवाईची प्रक्रिया गेल्या काही दिवसांपासून सुरू असल्याची चर्चा होती. त्यातही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात ठाम भूमिका घेत कोळीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. अधिकाऱ्यांच्या कठोर भूमिकेमुळेच कोळीवर त्वरित गुन्हा दाखल करण्यात आला.तरुणीच्या असहायतेचा घेतला गैरफायदा

  • बांगलादेशातील तरुणींना चांगल्या नोकरीचे आमिष दाखवून सांगलीत आणत त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात आहे. यात महिलांकडून बनावट आधार कार्डही तयार करून त्याचा वापर केला जात आहे. याबाबत ‘लोकमत’ने वारंवार प्रकाशझोत टाकला आहे.
  • पोलिसांच्या कारवाईची शक्यता लक्षात घेऊन बांगलादेशी तरुणींना तेथून हलविले होते. पोलिस कोळी याने तरुणीच्या असहायतेचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचार केला. शिवाय खंडणीही उकळल्याने गंभीर प्रकार समोर आला आहे.

रक्षकच बनला भक्षकसमाजातील कोणताही घटक असो त्याचे संरक्षण व अन्याय झाल्यास न्याय मिळवून देण्यासाठी पोलिस नेहमीच प्राधान्य देतात. याचमुळे अन्याय झालेल्या घटकाला न्याय मिळतो. संशयित स्वप्नील कोळी याने मात्र, रक्षण न करता खाकीचा गैरवापर करत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केले. 

टॅग्स :SangliसांगलीPoliceपोलिस