शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: गोटखिंडी, बावची परिसरातील ऊसाची वाहतूक रोखली; हुतात्मा कारखान्याच्या गट कार्यालयाला टाळे ठोकले

By संतोष भिसे | Updated: October 31, 2023 17:40 IST

गोटखिंडी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बावची, गोटखिंडी, पडवळवाडी (ता. वाळवा) राजारामबापू पाटील साखर कारखाना व हुतात्मा किसन अहिर ...

गोटखिंडी : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बावची, गोटखिंडी, पडवळवाडी (ता. वाळवा) राजारामबापू पाटील साखर कारखाना व हुतात्मा किसन अहिर कारखान्यांकडे निघालेला ऊस रोखला. बावची येथे हुतात्मा कारखान्याच्या गट कार्यालयाला टाळे ठोकले.कार्यकर्त्यांनी ऊसाच्या आठ ट्रक्टरच्या टायरमधील हवा सोडून वाहतूक रोखली.ठिकठिकाणीच्या ऊसतोडी बंद पाडल्या. यावेळी ऊस उत्पादक शेतकरी, वाहतूकदार व कार्यकर्त्यांत बाचाबाची झाली. ऊसाला ४०० रुपये दुसरा हप्ता व चालू वर्षीच्या ऊसाला मागणीनुसार दर मान्य झाल्याशिवाय ऊस सोडणार नाही अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली. शेतकऱ्यांनीही त्याला सहमती दर्शविली. त्यानंत आंदोलन तंडावले.वाळवा तालुकाध्यक्ष भागवत जाधव म्हणाले, बाजारपेठेत साखरेचा सरासरी भाव प्रतिक्विंटल ३८५० रूपये आहे. यावर्षी ऊसाचे उत्पादन कमी झाले आहे. शेतकऱ्यांनी काही दिवस ऊसतोडी बंद ठेवाव्यात. ऊसाच्या कांडीला सोन्याची कांडीसारखा भाव आहे. तिला भंगाराच्या किंमतीत विकू नका. साखरेच्या व उपपदार्थांच्या दराचा फायदा शेतकऱ्याला मिळाला पाहिजे. थोडा धीर धरल्यास प्रतिटन साडेचार ते पाच हजार रुपये भाव मिळू शकतो.यावेळी संदीप राजोबा, संजय बेले, बाबासाहेब सांद्रे, जगन्नाथ भोसले, प्रताप पाटील, प्रभाकर पाटील, प्रकाश माळी, शीतल सांद्रे, नितीन पंडित, विलास यादव, शामराव जाधव, प्रवीण कोल्हे, गिरीश पाटील, भरत साजणे, दीपक मगदूम, सागर वळवडे, मनोज सरडे, रोहित साळुंखे, प्रवीण पाटील, सुनील कुदळे आदी उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखानेSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना