शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: चांदोली अभयारण्य, कांडवनमध्ये पर्यटकांची गर्दी; वनसंपदा, डोंगरदऱ्या पाहण्याबरोबरच बोटिंगचा लुटतायत आनंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 13:14 IST

हुल्लडबाजीला आळा हवा

सहदेव खोतपुनवत : शिराळा तालुक्यातील चांदोली धरण, अभयारण्य तसेच लगतचे कांडवण धरण आदी ठिकाणी पर्यटकांची गर्दी होत असून, वनसंपदा, डोंगरदऱ्या पाहण्याबरोबरच जलपर्यटनास प्राधान्य दिले जात आहे.कांडवण येथे विविध शाळकरी विद्यार्थीही भेट देत असून, येथे वनभोजन कार्यक्रमांचेही आयोजन केले जात आहे. सध्या सुरू असलेला हिवाळा ऋतू आणि थंड वातावरण यामुळे सर्वच ठिकाणी पर्यटनस्थळे गजबजली आहेत. याला शिराळा तालुक्यातील चांदोली धरण, अभयारण्य तसेच कांडवण धरणसुद्धा अपवाद नाही. या ठिकाणी सध्या दूरवरून पर्यटकांची गर्दी होत आहे.शिराळा तालुक्याचे वैभव असलेले चांदोली धरण, वसंत सागर जलाशय तसेच नदीपात्र पाहण्यासाठी पर्यटक प्राधान्य देत आहेत, शिवाय असंख्य पर्यटक अभयारण्य पाहण्याचाही मनमुराद आनंद लुटत आहेत. कांडवण जलाशयात बोटिंगची सुविधा उपलब्ध असल्याने पर्यटकांना ही आनंदाची पर्वणी ठरत आहे. अनेक शाळकरी विद्यार्थी वनभोजनासाठी कांडवण तसेच चांदोली परिसरात येत आहेत. निसर्गाच्या सान्निध्यात जेवण बनवून त्याचा आस्वाद घेत आनंद लुटला जात आहे.

हुल्लडबाजीला आळा हवाचांदोली परिसरात येणाऱ्या पर्यटकांमधून अनेक पर्यटक येथील पर्यावरणाला हानी पोहोचवण्याचे काम करतात. मद्यपान करून हुल्लडबाजी करणे, परिसरात केरकचरा करणे असे अनेक प्रकार येथे घडत असतात.या प्रकाराला पोलिसांनी आळा घातला पाहिजे तसेच स्थानिकांनीही याबाबत दक्षता घेतली पाहिजे. अनेक पर्यटक येथे मुक्कामी राहून आपल्या सहलीचा आनंद द्विगुणित करत आहेत. शिराळा, शाहूवाडी तालुक्यातील अनेक बचत गट, महिला मंडळे, सरकारी नोकरदार यांच्या सहलीही या पर्यटनस्थळांवर जात आहेत.

टॅग्स :Sangliसांगलीtourismपर्यटन